करौली : आपला पूर्ण दिवस हा सुरुवातीवर अवलंबून असतो. म्हणूनच सकाळी-सकाळी घरात भांडण करू नये, रडारड करू नये, असं मोठी माणसं सांगतात. शिवाय दिवस छान ऊर्जावान जावा म्हणूनच आपण नाश्ता अगदी व्यवस्थित करतो. त्याचप्रमाणे दिवसच नाही, तर आयुष्य सुरळीत जावं यासाठी ज्योतिषशास्त्रात सकाळी करण्याचे काही उपाय सांगितलेले आहेत.
अनेकजण सकाळ होताच त्या पूर्ण दिवसाला दोष देतात, हा दिवस का उजाडला, अशी नकारात्मक भावना मनात बाळगतात. बऱ्याचदा असं सोमवारबाबत होतं, रविवारच्या सुट्टीनंतर येणार हा पहिला कामाचा दिवस अनेकजणांना नकोस असतो. परंतु सकाळच्या वेळी मनात आलेल्या नकारात्मक विचारांमुळे केवळ तो विशिष्ट दिवसच खराब होत नाही, तर त्याचा परिणाम आपल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक स्थितीसह आपल्या कुटुंबियांच्या सुख, समृद्धीवरही होतो. त्यामुळे घरात दारिद्र्य येऊ नये असं वाटत असेल, तर प्रत्येक दिवसाची सुरुवात ही सकारात्मक पद्धतीनेच व्हायला हवी.
advertisement
राहू, केतू घरातच असतात; 'या' दिशेत असतो वास, तिथे चूकून रुपयाही ठेवू नका!
सकाळी झोपेतून उठल्यावर नेमकं काय करू नये?
- सकाळच्या वेळी कधीच आई-वडिलांचा अपमान करू नये. पुरुषांनी आपल्या पत्नीवर, मुलीवर किंवा बहिणीवर चुकूनही यावेळी रागवू नये.
- आपण ज्या बिछान्यावर झोपतो, तो आपण उठल्या क्षणी व्यवस्थित घडी घालून जागच्या जागी ठेवावा. त्यावर लोळत बसू नये किंवा तो तसाच ठेवून जाऊ नये.
- सकाळच्या वेळी कोणत्याही नशेच्या पदार्थाचं सेवन करू नये.
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे झोपेतून उठल्यावर कधीच जनावरांना शिळे अन्नपदार्थ देऊ नये.
लग्न जुळण्यात अडचणी येतात, मनासारखा जोडीदार मिळतच नाहीये? काळजी नको, यावर उपाय आहे!
सकाळी झोपेतून उठल्यावर नेमकं काय करावं?
ज्योतिषी पंडित अनिल शर्मा सांगतात की, धार्मिक शास्त्रांमध्ये अशी काही कामं सांगितली आहेत जी सकाळी उठल्यानंतर केल्यास सौभाग्य प्राप्त होतं आणि आयुष्यातले सर्व कष्ट हळूहळू कमी होतात. त्यानुसार,
- सकाळी उठल्यावर सर्वात आधी दोन्ही हातांचे पंजे पाहून 'कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती। करमूले तू गोविन्दः प्रभाते करदर्शनम्॥' हा मंत्र म्हणावा. यामुळे देवी लक्ष्मी आणि देवी सरस्वतीचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहतो.
- सकाळी उठल्यावर भगवान गोविंद यांचं नामस्मरण केल्यास सुवर्ण दानाचं फळ मिळतं. ‘ओम वैष्णवें नमः’ हे मंत्र म्हणत त्यांना नमस्कार करावा, त्यामुळे अत्याधिक लाभ मिळतो.
- बिछान्यावरून पाय जमिनीवर ठेवण्यापूर्वी धरणीमातेला नमस्कार करावा. जेव्हा पाय जमिनीवर ठेवू तेव्हा तिची माफी मागावी.
- हे सर्व कार्य केल्यानंतर स्वच्छ स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करणं आवश्यक आहे. त्यामुळे आयुष्यात जास्त अडचणी येत नाहीत आणि आलेल्या अडचणींवर मात करण्याचं बळ मिळतं.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
