लग्न जुळण्यात अडचणी येतात, मनासारखा जोडीदार मिळतच नाहीये? काळजी नको, यावर उपाय आहे!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
स्वच्छ मनाने आणि पूर्ण विश्वासाने हे उपाय केले तर निश्चितच आपल्याला आपल्या आयुष्याचा जोडीदार मिळेल जो शेवटच्या श्वासापर्यंत तुमची साथ सोडणार नाही.
शिखा श्रेया, प्रतिनिधी
रांची : व्हॅलेंटाईन डेला आता काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळे तो नेमका कसा साजरा करायचा याची कपल्सकडून जोरदार तयारी सुरू असेल. जे सिंगल असतील त्यांच्यासाठी मात्र व्हॅलेंटाईन डे आला काय आणि गेला काय सारखंच आहे. परंतु आयुष्यभर असं चालणार नाही. प्रत्येकाला आपलं हक्काचं प्रेम मिळायलाच हवं. तुमचं प्रेमसुद्धा आता काही दूर नाही. तुम्हाला असा जोडीदार मिळेल जो अगदी तुमच्यावर जीव ओवाळून टाकेल आणि आयुष्यभर तुमची साथ देईल. फक्त त्यासाठी तुम्हाला काही उपाय करणं गरजेचं आहे.
advertisement
झारखंडची राजधानी असलेल्या रांचीचे ज्योतिषी संतोष कुमार चौबे यांनी सांगितलं की, ज्योतिषशास्त्रात प्रेम मिळवण्यासाठी अनेक उपाय दिलेले आहेत. स्वच्छ मनाने आणि पूर्ण विश्वासाने हे उपाय केले तर निश्चितच आपल्याला आपल्या आयुष्याचा जोडीदार मिळेल जो शेवटच्या श्वासापर्यंत तुमची साथ सोडणार नाही. त्यामुळे हे उपाय नेमके कोणते आहेत, पाहूया.
advertisement
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमाचा संबंध आपल्या कुंडलीतल्या पाचव्या स्थानाशी असतो. हे स्थान जर मजबूत असेल, तर आपल्याला चिंता करण्याचं काहीच कारण नसतं. प्रत्येक राशीच्या पाचव्या स्थानाचा स्वामी ग्रह वेगळा असतो. म्हणजेच काही राशींचा स्वामी ग्रह चंद्र असतो, तर काही राशींचा गुरू असतो. जर आपल्या कुंडलीत हे पाचवं स्थान कमकुवत असेल, तर आपण आपल्या स्वामी ग्रहाच्या विशिष्ट बीज मंत्राचा जप करू शकता. पूर्ण श्रद्देने हा मंत्रजप केल्यास आपल्याला आपलं खरं प्रेम मिळण्यास वेळ लागणार नाही.
advertisement
कधी करावा मंत्रजप?
ज्योतिषांनी सांगितलं की, कोणताही मंत्रोच्चार ब्रह्म मुहूर्तावर करावा. तरच त्याचं फळ 5 पटीने अधिक मिळतं. त्यामुळे सकाळी 4:00 वाजता उठून आंघोळ करून जमिनीवर बसावं आणि आपल्या कुंडलीतील पाचव्या स्थानाच्या स्वामी ग्रहाचा मंत्रजप करावा. हा जप कितीवेळा करावा हे आपल्या स्वामी ग्रहावर अवलंबून आहे, ते आपली कुंडली पाहूनच सांगता येईल, असं ज्योतिषी म्हणाले.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsलेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा
Location :
Ranchi,Jharkhand
First Published :
February 10, 2024 4:56 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
लग्न जुळण्यात अडचणी येतात, मनासारखा जोडीदार मिळतच नाहीये? काळजी नको, यावर उपाय आहे!


