प्यार दोस्ती है, हेच म्हणावं लागेल! जग इकडचं तिकडे झालं तरी 'या' राशींचं लग्न होणार नाही
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
असं नाहीये की अरेंज मॅरेजमध्येच भांडण होतं. भांडण हे लव्ह मॅरेजमध्येही होतं आणि ते इतकं टोकाचं असतं की कधी कधी घटस्फोटापर्यंत पोहोचतं.
शिखा श्रेया, प्रतिनिधी
रांची : प्रेम कधी होईल, मन कोणावर जडेल काही सांगता येत नाही. प्रेमाला जात किंवा धर्म नसतो. प्रेमात असतं ते फक्त झुरणं आणि एकमेकांसाठी जीवाचीही पर्वा न करणं. परंतु प्रेमाची सुरुवात ही केवळ हृदयापासून होते असं नाहीये हं, तर ज्योतिषशास्त्र सांगतं की, प्रेमाची सुरूवात राशींपासून होते. असं म्हणतात की, जोड्या या स्वर्गात बांधल्या जातात, त्यामुळे जमिनीवर त्या कोणत्याही परिस्थितीत जुळतातच. त्याचप्रमाणे काही राशींच्या जोड्या जुळणं हे नशिबातच लिहिलेलं असतं. तर, याउलट ज्योतिषशास्त्रात अशाही काही राशी सांगितलेल्या आहेत, ज्यांची जोडी जुळणं, ज्यांचं एकमेकांवर प्रेम जडणं अवघडच नाही, तर जवळपास अशक्य आहे. त्यामुळे प्रेमाची सुरूवात करताना मनासोबत वाहून जाऊ नका, समोरच्या व्यक्तीला व्यवस्थित पारखून घ्या.
advertisement
असं नाहीये की, अरेंज मॅरेजमध्येच भांडण होतं. भांडण हे लव्ह मॅरेजमध्येही होतं आणि ते इतकं टोकाचं असतं की कधी कधी घटस्फोटापर्यंत पोहोचतं. म्हणूनच लग्न करताना आपला होणारा जोडीदार व्यक्ती म्हणून कसा आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, कुटुंब कसं आहे, शिक्षण किती झालंय, इत्यादींसह त्याची कुंडलीसुद्धा तपासून घ्यायला हवी. झारखंडची राजधानी असलेल्या रांचीतील प्रसिद्ध ज्योतिषी संतोष कुमार चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही राशी अशा आहेत, ज्या परिस्थिती कितीही उत्तम असो कधीच एकत्र राहू शकत नाहीत.
advertisement
ज्योतिषी सांगतात की, मकर आणि सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये प्रेम होऊ शकत नाही. मकर राशीच्या व्यक्ती अबोल असतात. ते एकांतात आणि सिरीयस वातावरणात राहणं पसंत करतात. जास्त बोलणं, फिरायला जाणं, पार्टी करणं त्यांना आवडत नाही. भरपूर मित्र-मैत्रिणी बनवायला त्यांना आवडत नाही. ते आपल्या आपल्या कामात व्यस्त असतात. तर, सिंह राशीच्या व्यक्तींना धमाल, मस्ती, पार्टी करायला आवडते. त्यांना लोकप्रियता मिळवायला आवडते. हे लोक जास्त वेळ एकाठिकाणी शांत बसू शकत नाहीत. त्यांना बाहेर फिरायला प्रचंड आवडतं.
advertisement
पत्नीशी भांडण, नवऱ्याच्या डोक्यात गेला राग, जे केलं त्यामुळे गावकऱ्यांना झाला त्रास, नेमकं काय घडलं?
या अशा भिन्न आवडीनिवडी आणि सवयींमुळेच या राशीच्या व्यक्तींचं एकत्र कधीच पटू शकत नाही. कदाचित सुरुवातीला एकमेकांविषयी आकर्षक वाटेलही, पण कालांतराने लहान लहान गोष्टींवरून खटके उडायला सुरूवात होईल आणि हेच लहान भांडण कधी टोकाला जाईल हे त्यांचं त्यांनाच कळणार नाही.
advertisement
प्रत्येक राशीचा असतो स्वतःचा स्वभाव
ज्योतिषी सांगतात की, प्रत्येक राशीच्या व्यक्तींचा स्वतःचा असा एक स्वभाव असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती स्वतःमध्ये धुंद आणि बुद्धिमान असतात. त्यांचं तूळ किंवा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसोबत चांगलं जमतं. कारण या तीनही राशींचा स्वभाव सारखाच असतो. परंतु मिथुन आणि सिंह राशीच्या व्यक्तींचा स्वभाव विरोधी असल्याने त्यांची जोडी जमल्यास त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय त्यांचं नातं एकदाच संपत नाही, तर पुन्हा पुन्हा त्यांच्यात टोकाचं भांडण होतं आणि हळूहळू हे नातं संपुष्टात येतं.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsलेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
Location :
Ranchi,Jharkhand
First Published :
February 09, 2024 4:26 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
प्यार दोस्ती है, हेच म्हणावं लागेल! जग इकडचं तिकडे झालं तरी 'या' राशींचं लग्न होणार नाही


