राहू, केतू घरातच असतात; 'या' दिशेत असतो वास, तिथे चूकून रुपयाही ठेवू नका!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू, केतूची स्थिती वाईट असेल, तर त्या व्यक्तीला नको नको त्या अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु जर घरात सुख, शांती समृद्धी नांदली तर...
दुर्गेश सिंह राजपूत, प्रतिनिधी
नर्मदापुरम : घर जितकं महत्त्वाचं असतं, घरातली माणसं जितकी महत्त्वाची असतात, तितकीच घराची रचना आणि घरातल्या वस्तूंची मांडणीही महत्त्वाची असते. ज्योतिषशास्त्र सांगतं की, आनंदात राहण्यासाठी वास्तूशास्त्रांच्या नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे.
ज्योतिषी पंडित पंकज पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, घराची प्रत्येक दिशा वास्तू नियमांनुसार असायला हवी. या दिशांमध्ये काही वस्तू ठेवणं शुभ असतं, तर काही वस्तू ठेवणं अशुभ असतं. म्हणूनच त्यांबाबत पुरेशी माहिती असणं आवश्यक आहे. कारण घरात राहू आणि केतूचाही वास असतो. त्यांच्या छायेपासून वाचण्यासाठी वास्तू नियमांचं पालन व्हायला हवं.
advertisement
एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू, केतूची स्थिती वाईट असेल, तर त्या व्यक्तीला नको नको त्या अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु जर घरात सुख, शांती समृद्धी नांदली तर घरातल्या व्यक्तींची केवळ प्रगतीच होत नाही, तर त्यांचं आरोग्यही छान सुदृढ राहतं.
advertisement
तिजोरी कुठे असावी?
घराच्या नैऋत्य दिशेत चुकूनही पैसे किंवा तिजोरी ठेवू नये. त्यामुळे असह्य अशा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. शिवाय या दिशेत दागिनेही ठेवू नये, त्यामुळे नुकसान सहन करावं लावू शकतं. कारण याच दिशेत राहू आणि केतूचं अस्तित्त्व असतं. त्यामुळे या दिशेवर व्यवस्थित लक्ष ठेवा.
advertisement
'या' गोष्टींची काळजी घ्या!
तुळशीला लक्ष्मी देवीचं रूप मानतात. त्यामुळे हे रोपही नैऋत्य दिशेत ठेवू नये. जर तुळस या दिशेत असेल, तर घरात येणारा सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आटतो आणि नकारात्मक बदल पाहायला मिळतात. अर्थातच या दिशेत देवघरही नसावं. कारण इथं पूजा केल्यास पूर्ण फळ मिळत नाही.
नुकसानापासून कसं वाचायचं?
नैऋत्य दिशेत जशा पवित्र वस्तू ठेवू नये, तसंच त्याजागी टॉयलेटही बांधू नये. इथं टॉयलेट असेल, तर घरातले सदस्य एकामागून एक आजारी पडतात. शिवाय या दिशेत पुस्तकं असतील, तर त्याचा परिणाम थेट आपल्या बुद्धिमत्तेवर होतो. मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsलेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
Location :
Madhya Pradesh
First Published :
February 10, 2024 2:42 PM IST


