आग्नेय दिशा?
वास्तुशास्त्रानुसार, पूर्व आणि दक्षिण दिशेच्या मधली जागा ही आग्नेय कोन (आग्नेय दिशा) म्हणतात. ही दिशा अग्नी तत्वाशी संबंधित आहे. कारण या दिशेवर सूर्यकिरणांचे वर्चस्व सर्वाधिक असते. त्यामुळे या दिशेला कोणतीही गोष्ट काळजीपूर्वक विचार केल्यानंतरच केली जाते. विशेषत: इलेक्ट्रिक आणि ज्वलनशील वस्तू येथे ठेवल्या जात नाहीत. यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतात, असे मानले जाते.
advertisement
मनाची तयारी असावी! वर्ष 2025 या राशीसाठी बिकट; साडेसातीचा पहिला टप्पा होतोय सुरू
बेडरूम नको -
वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशेला बेडरूम बनवू नये, कारण ही दिशा अग्नि तत्वाचे प्रतिनिधित्व करते आणि अशा स्थितीत या दिशेला बेडरूम ठेवल्याने तुम्हाला अस्वस्थता, निद्रानाश आणि तणावासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याशिवाय तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि आर्थिक नुकसानही होऊ शकते.
पाण्याशी संबंधित गोष्टी -
आग्नेय कोपऱ्यात पाण्याशी संबंधित वस्तूही ठेवू नये, कारण पाणी आणि अग्नि हे एकमेकांच्या विरुद्ध तत्व आहेत. येथे बोअरिंग, हातपंप, पाण्याची टाकी किंवा नळ बसवू नये. असे केल्यास आपल्याला नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात. तुम्हाला मानसिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
स्वप्नात या 4 गोष्टी पाहणं अतिशय वाईट! मृत्युसमान अशुभ घटनांचे संकेत
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)