Shani: मनाची तयारी असावी! वर्ष 2025 या राशीसाठी बिकट; साडेसातीचा पहिला टप्पा होतोय सुरू
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shanidev: शनीची साडेसाती म्हटलं की प्रत्येकाची चिंता वाढते. कारण हा कालावधी जीवनात समस्यांचा डोंगर उभा करतो, असं मानलं जातं. ज्योतिषशास्त्रात शनी या ग्रहाला कर्म आणि न्यायदेवता म्हणतात. माणसानं केलेल्या चांगल्या अगर वाईट कर्मानुसार साडेसातीत फळं मिळतात. सध्या शनी कुंभ या स्व-राशीत गोचर करत आहे.
advertisement
ज्योतिष शास्त्रात शनी हा क्रूर ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीवर शनीची वक्रदृष्टी पडते, त्याच्या जीवनात संकटांची मालिका सुरू होते. शनी मंदगती ग्रह असल्याने साडेसातीचा परिणाम दीर्घ काळ जाणवतो. 2025 मध्ये शनी कुंभ राशीतून बाहेर पडत गुरूच्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीच्या राशिपरिवर्तनामुळे काही राशींची साडेसाती, अडीचकी संपणार असून, काही राशींच्या अडचणी वाढायला सुरुवात होईल.
advertisement
advertisement
शनी राशीफळानुसार, 2025 हे वर्ष मेष राशीच्या व्यक्तींसाठी कठीण असू शकतं. शनीच्या साडेसातीचा दुष्परिणाम टाळण्यासाठी मेष राशीच्या व्यक्तींनी खर्च नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. व्यवहारात सावधगिरी बाळगा. कागदपत्रांशिवाय कोणालाही मोठी रक्कम उधार किंवा कर्ज म्हणून देऊ नका. वादविवादापासून दूर राहा. विनाकारण वाद टाळा. अनोळखी व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. विरोधक त्रास देतील. आरोग्याची काळजी घ्या. साडेसातीची तीव्रता कमी व्हावी यासाठी उपाय करा.
advertisement
साडेसाती सुरू होताच मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक समस्या, आरोग्यविषयक समस्या, दुर्घटना, मानहानी, करिअरमध्ये आव्हानांचा सामना करावा लागेल. त्यामुळे 2025 या वर्षात साडेसातीमुळे मेष राशीच्या व्यक्तींना समस्या त्रस्त करतील. या राशीच्या व्यक्तींनी साडेसातीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी पुरेशी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)