देवघर : ग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना असली तरी तिला धार्मिकशास्त्रात विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्रग्रहण अनन्यसाधारण मानलं जातं. या ग्रहणापूर्वीचे काही तास सूतक काळाचे असतात. तेव्हा कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. शिवाय ग्रहणाचा प्रभाव मानवी आयुष्यावर पडतो.
नव्या वर्षात एकूण पाच ग्रहण लागणार आहेत. यात तीन चंद्रग्रहण आणि दोन सूर्यग्रहण असतील. झारखंडच्या देवघर भागातील ज्योतिषांनी वर्षातील पहिल्या ग्रहणाबाबत माहिती दिली आहे. या ग्रहणाचा आपल्या आयुष्यात काय परिणाम होणार, याबाबतही त्यांनी सविस्तर सांगितलंय.
advertisement
रात्रीच्या अंधारात प्रचंड आकर्षक दिसतं श्रीरामांचं मंदिर, पाहा डोळे दिपवणारं दृश्य
ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल म्हणाले, यंदा धुलिवंदनाला म्हणजेच 25 मार्चला वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण असेल. ग्रहणाला मूळातच अशुभ मानलं जातं. त्यात हे ग्रहण आणखी अशुभ असणार आहे. कारण ग्रहणाच्या वेळी चंद्र कन्या राशीत विराजमान असेल. या राशीत राहू आधीपासूनच आहे. त्यामुळेच या ग्रहणाचा अशुभ प्रभाव पडेल.
प्रत्येक मंदिराच्या दारातच असते घंटा, एवढं काय महत्त्व आहे तिला? वाचल्यानंतर दररोज कराल घंटानाद!
कधी सुरू होईल ग्रहण?
2024चं पहिलं चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार, 25 मार्चच्या सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी सुरू होईल, तर दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी संपेल. भारतातून हे ग्रहण दिसणार नाही, त्यामुळे याचा सूतक काळही आपल्याला लागू होणार नाही. दरम्यान, अमेरिका, जपान, रशिया, स्पेन, फ्रान्स, इटली, पोर्तुगाल आणि दक्षिण नॉर्वे, इत्यादी देशांमधून हे ग्रहण दिसेल.
'या' राशीच्या व्यक्तींनी राहावं सावध!
जरी हे ग्रहण भारतातून दिसणार नसलं, तरीही त्याचा प्रभाव मात्र सर्व 12 राशींवर पडेल. ग्रहणाच्या वेळी कन्या राशीतच चंद्र आणि राहू असल्याने या राशीच्या व्यक्तींनी जरा जपून राहावं. आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
