TRENDING:

गणेश चतुर्थीसाठी घरी कधी आणावा बाप्पा? काय आहे शूभ मुहूर्त? संकट टाळण्यासाठी पाहा सर्व माहिती

Last Updated:

गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचं घरोघरी आगमन होतं. त्या दिवशी बाप्पाला घरी आणण्याची योग्य वेळ कोणती?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डोंबिवली 9 सप्टेंबर : गणपती बाप्पाच्या आगमनाचे आता सर्वांना वेध लागलेत. गणेश मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. सर्व बाजारपेठा त्यानिमित्तानं सजल्या आहेत. बाजारात ठिकठिकाणी गणेश मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. यावर्षी 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. तेव्हापासून 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जाईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचं घरोघरी आगमन होतं. त्या दिवशी बाप्पाला घरी आणण्याची योग्य वेळ कोणती? बाप्पाची प्रतिष्ठापना करण्याचा शूभ मुहूर्त कोणता? कोणत्या गोष्टींची विशेष खबरदारी घ्यावी याची माहिती डोंबिवलीतले गुरुजी सचिन कुलकर्णी यांनी दिली आहे.
advertisement

बाप्पाला घरी कधी आणवे?

पिठोरी आमवस्येनंतर म्हणजेच 16 सप्टेंबरनंतर 19 तारखेला सकाळपर्यंत कधीही बाप्पाला घरी आणले तरी चालेल, असं कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं. ही मूर्ती आणताना एक पाट घ्यावा. या पाटावर एक लाल वस्त्र टाकावे. त्यानंतर त्यावर तांदळाचे स्वस्तिक कढावे किंवा तांदूळ ठेवावे . त्यावर बाप्पाची मूर्ती ठेवावी आणि ती लाल कापडात झाकून आणावी. आपली मूर्ती स्थापन करायची आहे. त्यामुळे लाल कपड्यानं ती झाकून ठेवावी.

advertisement

1929 मधील गणेशाची अद्भुत मूर्ती, द्विमुखी रुपात विराजमान आहे बाप्पा, आहे अनोखा इतिहास

मूर्तीची स्थापना करताना तो कपडा काढावा. मूर्तीच्या डोळ्यांना हाताने दूध आणि पाणी लावावे त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीनं त्याची स्थापना करावी, असं कुलकर्णी यांनी सांगितलं.

काय आहे शूभ मुहूर्त?

बाप्पाची स्थापना करण्यासाठी शूभ मुहूर्त कोणता? हा प्रश्न अनेकांना पडतो. यावर्षी गणेश चतुर्थी ही मंगळवारी आलीय. त्यामुळे आंगारा योग आहे. या योगामुळे मूर्तीची स्थापना करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नाही. गणेश चतुर्थी 1.45 वाजता आहे. तोपर्यंत तुम्ही बाप्पाची स्थापना करू शकता, असं कुलकर्णी यांनी सांगितलं.

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
गणेश चतुर्थीसाठी घरी कधी आणावा बाप्पा? काय आहे शूभ मुहूर्त? संकट टाळण्यासाठी पाहा सर्व माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल