1929 मधील गणेशाची अद्भुत मूर्ती, द्विमुखी रुपात विराजमान आहे बाप्पा, आहे अनोखा इतिहास

Last Updated:

भगवान गणेशाची ही 8 फूट उंच मूर्ती, एक दगडावर असून दोन स्वरुपातील गणेशाचे दर्शन देते.

बाप्पाची द्विमुखी (क्रेडिट-सोशल मीडिया)
बाप्पाची द्विमुखी (क्रेडिट-सोशल मीडिया)
मंदसौर, 8 सप्टेंबर : हिंदू धर्मामध्ये गणेश उत्सवाचे फार विशेष असे महत्त्व आहे. गणेश उत्सवामध्ये संपूर्ण 10 दिवस आनंदी आणि उत्साहाचे वातावरण असते. आगामी काळात लवकरच गणेशोत्सव जवळ येत असल्याने बाजारातही लगबग पाहायला मिळत आहे. आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण आज एका अशा गणेश मंदिराची कथा जाणून घेणार आहोत, ज्याबाबत तुम्ही कदाचित ऐकले नसेल. अनोखे असे हे गणेश मंदिर आहे.
हे गणेश मंदिर मध्यप्रदेशच्या मंदसौर याठिकाणी आहे. मंदसौर येथील गणपती चौकमध्ये द्विमुखी रुपमध्ये विराजमान असलेले गणपती बाप्पा विराजमान आहेत. असं म्हटलं जातं की, चिंताहरण गणेशाची ही मूर्ती 9 व्या शतकातील आहे. ही मूर्ती एका दगडापासून बनलेली आहे. ही मूर्ती अनोखी असून यासंबंधित कहाणीही अनोखी आहे. नेमकी ही कहाणी काय आहे हे जाणून घेऊयात.
advertisement
भगवान गणेशाची ही 8 फूट उंच मूर्ती, एक दगडावर असून दोन स्वरुपातील गणेशाचे दर्शन देते. उत्तर दिशेत गणेशाची पाच सोंडवाली मूर्ती आहे, जी रिद्धी सिद्धीचे दाता मानली जाते. तर दक्षिण भागात गणेशजी शेठ स्वरुपात विराजित आहेत.
धार्मिक मान्यता अशी आहे की, पंचमुखी गणेशजींची सर्व मनोकामना पूर्ण करतात. तर व्यवसाय आणि उद्योगात धनप्राप्तीसाठी सेठ गजाननाचे दर्शन लाभदायक मानले जाते. असे म्हटले जाते की, शेठ रुपी गणपतीचे दर्शन केल्यावर भाविकांना गणपती बाप्पा, तुम्हाला काय हवं, असं विचारत असल्याची अनुभूती होते. पृष्ठभाग हा दरित्रताचा प्रतिक असतो, त्यामुळे चिंताहरण गणेशजीच्या पृष्ठभागावर शेठ रुपी गणपती विराजमान आहेत.
advertisement
जसजसे याठिकाणी आलेल्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत गेल्या, तसतशी याठिकाणी गर्दी होत गेली. चिंताहरण गणेशाला वस्त्र अर्पण करण्यासाठी भक्तांना तीन ते चार वर्ष थांबावे लागते.
मंदिराच्या मूर्तीबाब मंदिराचे पुजारी सत्यनारायण जोशी सांगतात की, मूलचंद बसाबला गणेशाने स्वप्नात दर्शन दिले आणि त्यांना तलावातून बाहेर काढण्यासाठी सांगितले. यानंतर मंदसौरच्या नाहर सैयद तलावात खोदकाम करण्यात आले आणि 22 जून 1929 रोजी जमिनीतून याठिकाणी एक अद्भुत अशी प्रतिमा बाहेर आली. यानंतर बैलगाडीच्या माध्यमातून मूर्तीला निर्सिंगपुरा घेऊन जाण्यात येत होते. याठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात येणार होती. मात्र, जनकुपुरा येथील इलायची चौक पोहोचल्यावर बैलगाडी अचानक थांबली आणि गणेशाच्या मूर्तीला प्रयत्न करुनही पुढे घेऊन जाऊ नाही शकले.
advertisement
त्यावेळी हा सर्व प्रकार पाहून स्थानिक लोकांनी याला देवाचा चमत्कार आहे असे मानत, या प्रतिमेला इथेच स्थापित केले. त्यादिवसापासून भगवान गणेश त्याचठिकाणी विराजमान आहेत. आज ज्या जागेवर गणेशजी विराजमान आहे, त्या चौकला आधी इलायची चौक असे म्हटले जाते, यानंतर या चौकचे नाव गणपती चौक असे पडले.
वर्षभर होतात अनेक आयोजन -
गणपती चौकात विराजित द्विमुखीय भगवान गणेश मंदिरात वर्षभर विविध प्रकारचे आयोजन होतात. तर याच दिवशी गणेशोत्सवा दरम्यान मंदिरात विशेष आयोजन केले जाते. गणपती चौकात सध्या मोहक लायटिंगने सजावट करण्यात आली असून 10 दिवस विविध प्रकारचे आयोजन होते.
मराठी बातम्या/अध्यात्म/
1929 मधील गणेशाची अद्भुत मूर्ती, द्विमुखी रुपात विराजमान आहे बाप्पा, आहे अनोखा इतिहास
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement