असा आहे श्री गणेश स्थापनेचा मुहूर्त
ज्योतिष शास्त्रानुसार श्रीगणपती बाप्पाच्या पूजेचा अत्यंत शुभ मुहूर्त दिनांक 27 ऑगस्ट 2025 बुधवार, सकाळी 11:05 वाजेपासून ते दुपारी 01:40 वाजेपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर चंद्रास्तकाल: शुभ योग बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 09 वाजून 27 मिनिटांनी देखील आहे. तरी गणेश मूर्ती स्थापन ही सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी केली तर अतिशय उत्तम असणार आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यावे, असे समीर जोशी यांनी सांगितले आहे.
advertisement
शास्त्रानुसार कोणत्या स्वरूपातील मूर्तीची स्थापना करावी?
धर्म शास्त्रात ज्या मूर्तीची विटंबना होणार नाही अशा मूर्तीची स्थापना करण्याचे सांगितले आहे. मोठ्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा योग्य पद्धतीने केली जात नसते. यामुळे मंडळाच्या मूर्तीसमोर छोट्या स्वरूपातील प्रती मूर्ती पूजावी. तसेच धातूची मूर्ती पूजली तर अतिशय योग्य असते. त्याच पद्धतीने ज्या मूर्तीचे विसर्जन लागलीच होईल तिची काही दुर्दशा होणार नाही याकरता शाळू मातीच्या मूर्तीला प्राधान्य द्यावे.
गणपती प्राण प्रतिष्ठापना करताना कोणता मंत्र म्हणावा?
गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतानी ॐ भूर्भुवः स्वः गणेशाम्बिकाभ्यां नमः, सुप्रतिष्ठितो भव, प्रसन्नो भव, वरदा भव। या मंत्राचं पठण करा. मंत्र पठण करताना आसनासाठी भगवान गणेशाला पाच फुले अर्पण करा, असं समीर जोशी सांगतात.





