Ganeshotsav 2025 : गणपतीसमोर केळी, सफरचंद, पेरू, द्राक्ष, नारळ आणि सीताफळ ही पाच फळचं का ठेवतात, आंबा का नाही?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
गणेश चतुर्थीच्या काळात बाप्पाला विविध नैवेद्य, फुलं आणि फळं अर्पण केली जातात. यामध्ये काही खास फळांना विशेष महत्त्व दिलं जातं.
अमरावती : गणपती बाप्पाचे आगमन म्हणजे भक्तांसाठी आनंदाचा आणि श्रद्धेचा उत्सव असतो. गणेश चतुर्थीच्या काळात बाप्पाला विविध नैवेद्य, फुले आणि फळे अर्पण केली जातात. यामध्ये काही खास फळांना विशेष महत्त्व दिले जाते. केळी, सफरचंद, पेरू, द्राक्षे, नारळ आणि सीताफळ ही त्यातील काही प्रमुख फळे आहेत. ही फळे अर्पण करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे काय आहेत? याबाबत माहिती पुजारी येलकर महाराज यांनी दिली आहे.
गणपती बाप्पासाठी सर्वात महत्त्वाचे असलेले फळ म्हणजे केळी. केळी हे स्थिरतेचे प्रतीक आहे. गणपती पूजेत केळीचे झाड किंवा पान देखील वापरली जातात. केळी हे स्थिरता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे बाप्पाला केळी अर्पण करणे म्हणजे घरात स्थैर्य आणि सुख-समृद्धी येवो, ही भावना असते.
advertisement
दुसरे फळ आहे नारळ. नारळ हे पवित्रतेचे प्रतीक आहे. नारळ हे कोणत्याही पूजेतील आवश्यक घटक आहे. गणपती पूजेत नारळाचा वापर पवित्रता आणि एकाग्रतेचे प्रतीक म्हणून होतो. नारळ फोडणे म्हणजे अहंकाराचा त्याग करून आत्मशुद्धी साधणे असे मानले जाते.
तिसरे फळ आहे सीताफळ. सीताफळ हे शुद्ध आणि सात्विक फळ आहे. सीताफळ हे गणपतीला अत्यंत प्रिय फळ मानले जाते. सीताफळ गोडसर, पचण्यास हलके आणि सात्विक असल्याने ते पूजेसाठी योग्य मानले जाते. काही ठिकाणी गणेशोत्सवात सीताफळाचा नैवेद्य खास दिला जातो.
advertisement
चौथे फळ आहे सफरचंद आणि द्राक्षे हे दोन्ही आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. गणपतीला सफरचंद अर्पण करणे म्हणजे भक्तांच्या जीवनात आरोग्य नांदो, ही भावना त्यातून निष्पन्न होते. त्याचबरोबर द्राक्षे हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते, म्हणूनही ते पूजेत दिले जाते.
पाचवे फळ आहे पेरू. पेरूमध्ये सत्त्वगुणाची वृद्धी असते. पेरू हे फळही गणपतीला अर्पण केले जाते. पेरूमध्ये असलेले पोषक घटक आणि त्याचा सहज पचणारा गुणधर्म यामुळे ते सात्विक अन्न मानले जाते. गणपतीला नैवैद्य म्हणून सर्वच फळ दिली जातात. काही ठिकाणी आंबा सुद्धा गणपतीला नैवैद्य म्हणून दिला जातो. पण, सहसा गणेशोत्सवाच्या वेळी आंब्याचे सिजन राहत नाही. त्यामुळे गणपतीच्या नैवद्यमध्ये आंबा हे फळ आढळून येत नाही.
advertisement
गणेश पूजेत वापरली जाणारी फळे केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून, त्यामध्ये आरोग्यदायी घटकही मोठ्या प्रमाणात असतात. नैवेद्याचे सेवन केल्यानंतर भक्तांना ऊर्जा, पचनास मदत, आणि संतुलित आहार मिळतो, हेही या परंपरेचे एक वैशिष्ट्य आहे, अशी माहिती पुजारी येलकर महाराज यांनी दिली.
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
August 26, 2025 3:14 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ganeshotsav 2025 : गणपतीसमोर केळी, सफरचंद, पेरू, द्राक्ष, नारळ आणि सीताफळ ही पाच फळचं का ठेवतात, आंबा का नाही?

