गर्भवती महिला
गरुड पुराणानुसार, गर्भवती महिलेने स्मशानभूमीत जाणे पूर्णपणे निषिद्ध आहे. स्मशानभूमीत नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त असतो. गर्भस्थ शिशु अत्यंत कोमल आणि संवेदनशील असतो. ही नकारात्मक ऊर्जा गर्भातील बाळावर आणि आईच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकते. तसेच, स्मशानभूमीतील वातावरण पाहून महिलेला होणारा मानसिक त्रास बाळासाठी घातक ठरू शकतो.
लहान मुले
advertisement
लहान मुलांना स्मशानभूमीत नेणे टाळावे, असे शास्त्रात सांगितले आहे. लहान मुलांची प्रतिकारशक्ती आणि मानसिक शक्ती कमी असते. स्मशानभूमीतील दृश्ये किंवा रडणे-ओरडणे पाहून मुले घाबरू शकतात. यामुळे त्यांच्या मनावर कायमचा भीतीदायक परिणाम होऊ शकतो. तसेच, तिथल्या धुरामुळे त्यांना श्वसनाचे त्रास होण्याची शक्यता असते.
आजारी व्यक्ती
ज्या व्यक्तींचे शरीर आधीच व्याधींनी ग्रासलेले आहे, त्यांनी अंत्यसंस्कारात जाणे टाळावे. स्मशानभूमीत मृतदेह जाळताना निघणारा धूर आणि वातावरणातील विषाणू आजारी व्यक्तीच्या शरीरात लवकर प्रवेश करू शकतात. यामुळे त्यांचा आजार अधिक बळावू शकतो.
ज्यांच्या घरी आधीच सुतक सुरू आहे
ज्यांच्या कुटुंबात अलीकडेच कोणाचा मृत्यू झाला आहे आणि ज्यांचे 'सुतक' अजून संपलेले नाही, त्यांनी दुसऱ्याच्या अंत्यविधीला जाऊ नये. शास्त्रानुसार, सुतक असलेल्या व्यक्तीची शुद्धी झालेली नसते. अशा स्थितीत दुसऱ्याच्या अंत्यविधीला गेल्याने दोन्ही कुटुंबांतील आध्यात्मिक ऊर्जेचा समतोल बिघडू शकतो.
अतिशय संवेदनशील किंवा भावनिक व्यक्ती
ज्या व्यक्तींचे मन खूप हळवे आहे किंवा जे दुःख सहन करू शकत नाहीत, त्यांनी स्मशानभूमीपासून दूर राहावे. अंत्यविधीच्या वेळी 'कपाल मोक्ष' किंवा मृतदेह जळतानाचे दृश्य पाहून अशा व्यक्तींना मानसिक धक्का बसू शकतो. यामुळे त्यांच्या मनात नैराश्य किंवा तीव्र भीती निर्माण होऊ शकते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
