TRENDING:

Gita Updesh: श्रीकृष्णाने सांगितलेले माणसाचे 3 अवगुण! यश-पैसा-किर्ती नेहमीच दूर राहते

Last Updated:

Gita Updesh Marathi: श्रीमद्भागवत गीतेत भगवान श्रीकृष्णाने माणसाच्या तीन दोषांबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे माणूस कधीही यशस्वी होऊ शकत नाही. तर पंडित रमाकांत मिश्रा यांच्याकडून जाणून घेऊया, ते 3 अवगुण कोणते आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिंदू धर्मातील ग्रंथांमध्ये श्रीमद्भगवद्गीता हा महान ग्रंथ मानला जातो. कारण यामध्ये श्रीकृष्णाने दिलेली सैद्धांतिक शिकवण आहे. त्या गोष्टी आजच्या युगातही तितक्याच महत्त्वाच्या आणि प्रासंगिक मानल्या जातात. गीतेची शिकवण लोकांना जगण्याची कला शिकवते. कदाचित म्हणूनच श्रीमद्भगवद्गीतेला केवळ भारतातच नाही तर परदेशातही खूप महत्त्व दिले जाते.
News18
News18
advertisement

जगभरात असे बरेच लोक आहेत, ज्यांना श्रीमद्भगवत गीता वाचायला आवडते. असे मानले जाते की जो कोणी हा ग्रंथ एकदा वाचतो आणि त्याची खोली समजून घेतो, तो जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये सकारात्मक आणि योग्य मार्ग निवडण्यास सक्षम होतो. श्रीमद्भागवत गीतेत भगवान श्रीकृष्णाने माणसाच्या तीन दोषांबद्दल सांगितले आहे, ज्यामुळे माणूस कधीही यशस्वी होऊ शकत नाही. तर पंडित रमाकांत मिश्रा यांच्याकडून जाणून घेऊया, ते 3 अवगुण कोणते आहेत.

advertisement

कोणत्याही वस्तू किंवा व्यक्तीबद्दल अति आसक्ती -

भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे की, एखादा मनुष्य कोणत्याही वस्तू, कल्पना किंवा व्यक्तीवर अतिरेकी आसक्त असतो, तेव्हा त्याची ऊर्जा आणि लक्ष त्यावर केंद्रित राहते आणि अशा परिस्थितीत आपण आपले ध्येय साध्य करू शकत नाही. त्यावरून विचलित होतो. परिणामी, आपण आपल्या जीवनातील उद्देश विसरून जातो आणि आपला वेळ आणि मन इतर कामांमध्ये वापरतो, यामुळे आपल्या यशात अडचणी येतात आणि आपण अपयशी ठरतो. म्हणून, श्रीकृष्ण सांगतात आपण ज्या गोष्टींशी जास्त आसक्त आहोत, त्यापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे.

advertisement

घरावरील अमंगळ दूर! मौनी अमावस्येला या मंत्राचं पठण शुभ; पितृ आशीर्वाद

अहंकार - भगवान श्रीकृष्ण श्रीमद्भागवत गीतेत म्हणतात की, अहंकार (घमंडी स्वभाव) माणसाला विनाशाकडे घेऊन जातो आणि तो माणसाची बुद्धी देखील भ्रष्ट करतो. अहंकारामुळे, एखादी व्यक्ती कधीही कोणाशीही चांगले आणि सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करू शकत नाही आणि असे लोक कधीही त्यांच्या चुका स्वीकारत नाहीत. जे त्यांच्यासाठी खूप घातक ठरते. कारण एखादी व्यक्ती आपली चूक मान्य करत नाही तोपर्यंत ती सुधारण्यात अपयशी ठरेल. एवढेच नाही तर, एखाद्या व्यक्तीमधील अहंकार त्याला अधोगती आणि विनाशाकडे घेऊन जातो, ज्यामुळे तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही, म्हणून कधीही अहंकारी वागू नये.

advertisement

मासिक राशीभविष्य! फेब्रुवारी महिना कोणासाठी कसा? या राशींच्या भोवती पॉवर, पैसा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

आळस - आळस हा असा दुर्गुण आहे जो माणसाला कधीही पुढे जाऊ देत नाही. आळशी माणूस दररोज आपले काम उद्यापर्यंत पुढे ढकलतो आणि ही सवय त्याच्या अपयशाचे कारण बनते. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की, आळस माणसाला कधीही यशस्वी होऊ देत नाही कारण आळशी माणूस फक्त विश्रांती घेऊ इच्छितो आणि तो कोणतेही काम करणे टाळतो. कठोर परिश्रम करतो त्यालाच यश मिळते, कारण तो वेळेवर काम पूर्ण करू शकतो. भगवान श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे की, आळशी व्यक्ती कधीही आनंद मिळवू शकत नाही. म्हणून, आपण आळस झटकून काम केले पाहिजे.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
Gita Updesh: श्रीकृष्णाने सांगितलेले माणसाचे 3 अवगुण! यश-पैसा-किर्ती नेहमीच दूर राहते
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल