छत्रपती संभाजीनगर : 30 मार्च रोजी गुढीपाडवा आहे आणि साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त हा असतो. या दिवशी आपण नवीन गाडी किंवा घर किंवा इतर कोणत्याही वस्तू या खरेदी करत असतो. तर या दिवशी कुठल्या मुहूर्तावरती नवीन वाहन किंवा सोने किंवा इतर कुठल्या गोष्टी तुम्ही खरेदी करू शकता? कुठला शुभ मुहूर्त आहे? याविषयीचं माहिती गुरुजी श्रीरामजी धानोरकर यांनी दिली आहे.
advertisement
खरेदीसाठी कुठला शुभ मुहूर्त?
गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यात पहिले तुम्ही सकाळी उठून अभ्यंग स्नान करावे. त्यानंतर गुढी उभी करावी. गुढीला नैवेद्य दाखवावा आणि गुढीला नमस्कार करून घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे. तसेच आपल्या घराला तोरण बांधावं. त्यानंतर जर तुम्हाला या दिवशी काही खरेदी करायचे असेल, म्हणजे वाहन, सोने, घर किंवा इतर कुठल्या गोष्टी खरेदी करायच्या असतील, तर त्या तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत खरेदी करू शकता. अतिशय चांगला असा मुहूर्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत आहे.
गुढीपाडव्याला 3 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात होईल सुखाचा झगमगाट, मिळेल तब्बल 5 ग्रहांचा आशीर्वाद!
या दिवशी आईंद्र योग आहे. हा योग असल्यामुळे तुम्ही जे पण या दिवशी काही खरेदी कराल त्यामध्ये तुम्हाला चांगला लाभ होतो आणि त्याच्यामध्ये वाढ होत जाते, असं गुरुजींनी सांगितलेलं आहे.
त्यामुळे तुम्ही संध्याकाळपर्यंत कुठलीही गोष्ट खरेदी करू शकता. तसंच जर तुम्ही नवीन वाहन खरेदी केले असेल तर सगळ्यात पहिले त्या वाहनाची पूजा करावी. पूजा करताना तुम्ही सर्वात पहिले विश्वकर्मा देवाची पूजा करावी. त्यांना नमन करावे. त्यानंतर तुम्ही गाडीचे चारही चाकास पाणी टाकावे. त्यानंतर हळद-कुंकू व्हावं आणि गाडीच्या समोर तुम्ही एक स्वस्तिक काढावं आणि त्यानंतर प्रार्थना विश्वकर्मा देवताकडे करावी. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गाडीची पूजा करावी.
तर या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने नवीन गोष्टी खरेदी करू शकता. तसेच जर नवीन वाहन खरेदी केले असेल तर त्याची तुम्ही अशा पद्धतीने पूजा करावी, असं गुरुजींनी सांगितलेलं आहे.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.