छत्रपती संभाजीनगर : इंग्रजी कॅलेंडरनुसार 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष सुरू होतं. पण हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होत असते. यावर्षी 30 मार्च रोजी गुढीपाडवा आहे. पण गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नवीन वर्ष का सुरू होतं? या मागे कुठली पौराणिक कथा आहे किंवा गुढीपाडव्याचे काय महत्त्व आहे? याविषयीचं गुरुजी श्रीरामजी धानोरकर यांनी माहिती दिली आहे.
advertisement
आपल्या भारतीय सनातन पद्धतीमध्ये गणित करण्याची एक जुनी पद्धत आहे. त्या पद्धतीला पंचांग पद्धत असं म्हटलं जातं. या पंचांग पद्धतीचा प्रारंभ हा गुढीपाडव्यापासून होत असतो. त्याला चैत्रशुद्ध प्रतिपदा असं देखील म्हटलं जातं. या दिवशी अनेक इतिहासात गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या गोष्टींचे खूप महत्त्व देखील आहे. ब्रह्मदेवांनी कृतयुगाची स्थापना करताना याच दिवशी केली होती. तसेच प्रभू राम या दिवशी त्यांचा वनवास संपून आयोध्यामध्ये परतले होते. म्हणून या दिवशी आपण गुढ्या उभारतो. दाराला तोरण लावतो आणि नवीन वर्ष साजरा करतो, असं गुरुजी श्रीरामजी धानोरकर यांनी सांगितलं.
Gudi Padwa 2025: सलग सुट्ट्यात आहेत, गोदाकाठचा प्लॅन करा, नाशिकमध्ये साजरा होतोय अनोखा गुढीपाडवा
तसेच या दिवशी तुम्ही गुढीची पूजा तर करावीच पण त्यासोबतच पंचांग असतं त्याची देखील पूजा करावी आणि ब्राह्मणांकडून चांगला आशीर्वाद घ्यावा. तसंच या दिवशी तुमचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी तुम्ही कडुलिंबाचा पाला त्यासोबतच चिंचगुळ यांचे एक मिश्रण करून हे देखील तुम्ही सेवन करावे जेणेकरून तुमचे आरोग्य वर्षभर हे चांगले राहील.
तर यामुळे आपण गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन हिंदू वर्ष साजरा करतो. तसेच सर्वांनी या दिवशी आपल्या मोठ्यांकडून देखील आशीर्वाद घ्यावे आणि आपले नवीन वर्षाची चांगली सुरुवात करावी, असं गुरुजी श्रीरामजी धानोरकर यांनी सांगितलं.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)