लग्नातील अडथळ्यांसाठी हळदीचा उपाय
ज्या तरुण-तरुणींच्या विवाहाचे योग जुळून येत नाहीत किंवा लग्नाचे बोलणे होऊनही तुटते, त्यांनी गुप्त नवरात्रीत हा उपाय करावा. नवरात्रीच्या नऊ दिवसांत रोज माता पार्वतीला 9 किंवा 11 हळकुंडे अर्पण करा. विवाहातील अडथळे दूर होऊन लवकरच शुभ वार्ता मिळेल, अशी धार्मिक मान्यता आहे.
करिअरमध्ये प्रगतीसाठी हा उपाय करा
advertisement
नोकरीत पदोन्नती मिळत नसेल किंवा व्यवसायात सतत नुकसान होत असेल, तर हा उपाय प्रभावी ठरतो. नवरात्रीच्या रात्री देवी दुर्गेसमोर तुपाचा दिवा लावा त्यानंतर 'ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे' या मंत्राचा जप करा. यामुळे करिअरमधील अडथळे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.
आर्थिक टंचाई दूर करण्यासाठी 'पान आणि श्रीं'चा उपाय
जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल किंवा कर्जाचा डोंगर वाढला असेल, तर हा गुप्त उपाय करा. अष्टमीच्या दिवशी एका स्वच्छ पानाच्या पानावर केशरने 'श्रीं' लिहा. हे पान देवीच्या चरणी अर्पण करा आणि काही काळानंतर ते आपल्या तिजोरीत ठेवा. यामुळे धनाचे आगमन वाढते.
नकारात्मक ऊर्जा आणि संकटांपासून मुक्ती
घरात सतत कटकटी किंवा कोणीतरी आजारी राहत असेल, तर हा उपाय लाभदायक आहे. नवरात्रीत दररोज सकाळी किंवा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि 11 परिक्रमा करा. परिक्रमा करताना 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' मंत्राचा जप करा. यामुळे पितृदोष आणि ग्रहदोष शांत होतात.
शत्रुविजय आणि यशासाठी 'बगलामुखी' साधना
जर तुमच्या कामात शत्रू अडथळे आणत असतील किंवा कायदेशीर प्रकरणांत अडकला असाल, तर हा उपाय करा. पिवळे वस्त्र परिधान करून माता बगलामुखी किंवा माता कमला यांची पूजा करा. त्यांना पिवळी फुले अर्पण करा. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि सर्व क्षेत्रात यश मिळते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
