साई भक्त रजपुत यांनी साईबाबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. साईबाबा हयात असल्यापासूनच्या छायाचित्रांची सामग्री करत त्याचबरोबर पुस्तकांमधून आणि सोशल मीडियाहून सर्व जुने आणि नवीन फोटो एकत्र करत जवळपास 1800 ते 2000 फोटोंचे प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून सुरत येथील साईभक्ताने साईबाबांच्या जुन्या आणि नवीन आठवणींना उजाळा दिलाय. साईभक्त जिग्नेश यांनी त्यांच्या टीम सोबत मिळून गेल्या पंधरा वर्षापासून यावर काम करत या प्रदर्शनाची तयारी केली आहे.
advertisement
प्रदर्शनात काय पाहाल?
या प्रदर्शनात श्री साईबाबांचे समकालीन भक्त, तसेच संस्थानमध्ये काळानुसार झालेल्या बदलांचे सुमारे 2 हजार छायाचित्रांच्या माध्यमातून दर्शन घडवले आहे. हे भव्य प्रदर्शन श्री साई मंदिर परिसरात भरविण्यात आले असून दर्शनाला येणारे सर्व साई भक्त छायाचित्र प्रदर्शन अत्यंत भावुक होऊन पाहात आहेत.
कधी पाहाता येणार प्रदर्शन?
शिर्डीतील साईबाबांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन प्रदर्शन गुरुपौर्णिमा उत्सवाच्या संपूर्ण कालावधीत भाविकांसाठी खुलं राहणार आहे. यातून साईबाबांची जुनी शिर्डी ते नवी शिर्डी पर्यंतचा प्रवास दाखवला आहे. अधिकाधिक साईभक्त आणि ग्रामस्थांनी या अनोख्या प्रदर्शनाचा लाभ घेत आहेत, असे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.