गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाईल?
वैदिक पंचांगानुसार, ज्योतिष्यांचे म्हणणे आहे की आषाढ पौर्णिमा 10 जुलै रोजी दुपारी 02:43 वाजता सुरू होत आहे. ती दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 11 जुलै रोजी दुपारी 01:53 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार, गुरुपौर्णिमा 10 जुलै रोजीच साजरी केली जाईल.
गुरुपौर्णिमेचे महत्त्व
पौराणिक मान्यतेनुसार, गुरुपौर्णिमा ही महाभारत रचणारे महर्षी वेद व्यास यांच्या जन्मदिनी साजरी केली जाते; म्हणूनच या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. असे मानले जाते की याच दिवशी वेद व्यासांनी चार वेदांची रचना केली होती. या दिवशी गुरु आपल्या शिष्यांना दीक्षाही देतात. या दिवशी प्रत्येकजण आपल्या गुरूंची पूजा करतो.
advertisement
भारत देशात गुरु आणि शिष्य यांची परंपरा फार जुनी आहे. वेळेनुसार अनेक गोष्टी बदलल्या, पण कोणतेही ज्ञान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला गुरुची गरज नक्कीच लागते. गुरुच तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात; म्हणूनच प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात गुरुचे विशेष महत्त्व आहे. जर गुरु नसेल तर कोणाची पूजा करावी?
सनातन परंपरेत जीवनातील सर्व समस्यांवर उपाय सांगण्यात आले आहेत. जर तुमचा गुरु नसेल, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यक्तीने आपल्या इष्ट देवतेला गुरु मानून पूजा करावी. हिंदू मान्यतेनुसार, जर तुमचा गुरु नसेल, तर तुम्ही प्रथम पूजनीय भगवान श्री गणेश, प्रत्यक्ष देव सूर्यदेव, लोककल्याणाचे देव मानले जाणारे भगवान शिव, जगाचे पालनहार भगवान विष्णू, पूर्णावतार भगवान श्री कृष्ण, आदिशक्ती किंवा कलियुगातील देव भगवान श्री हनुमानजी यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु मानून त्यांची पूजा करू शकता.
हे ही वाचा : भांडणं, आजारपण, पैशांची चणचण? तर तुमच्या घरात असू शकतो वास्तुदोष; लगेच तपासा आणि करा 'हा' उपाय
हे ही वाचा : Hartalika Teej 2025: महिलांसाठी 'हा' दिवस खास! देवी पार्वतीची करा विशेष पूजा; वैवाहिक जीवन होईल सुखी