TRENDING:

ह्याला म्हणतात नशीब! होळी संपताच ३० वर्षांनी या ३ राशींचा गोल्डन टाइम झाला सुरू, सुखशांतीसह आर्थिक भरभराट होणार

Last Updated:

Astrology News : वैदिक ज्योतिषानुसार ग्रहांच्या स्थितीतील बदलांचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असल्याचे मानले जाते. त्यामध्ये कर्मफळाचा कारक समजला जाणारा शनि देव विशेष महत्त्वाचा ग्रह मानला जातो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वैदिक ज्योतिषानुसार ग्रहांच्या स्थितीतील बदलांचा थेट परिणाम मानवी जीवनावर होत असल्याचे मानले जाते. त्यामध्ये कर्मफळाचा कारक समजला जाणारा शनि देव विशेष महत्त्वाचा ग्रह मानला जातो. न्याय, शिस्त आणि कर्मानुसार फळ देणारा ग्रह म्हणून शनिची ओळख आहे. तब्बल ३० वर्षांनंतर शनि मीन राशीत अस्त होणार असून, हा दुर्मीळ योग अनेक राशींसाठी निर्णायक ठरणार आहे. होळीच्या सणानंतर, १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजून १३ मिनिटांनी शनि मीन राशीत अस्त होईल. या खगोलीय घटनेचा प्रभाव सर्व १२ राशींवर जाणवणार असला तरी काही राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Astrology News
Astrology News
advertisement

शनिअस्ताचा व्यापक परिणाम

ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, ग्रह अस्त होणे म्हणजे त्याची उर्जा काही काळासाठी मंदावणे होय. त्यामुळे त्या ग्रहाच्या कारकत्वाशी संबंधित क्षेत्रांत बदल दिसून येतात. शनि हा मेहनत, संयम, कर्तव्य आणि जबाबदारीशी संबंधित ग्रह आहे. त्यामुळे शनिच्या अस्तकाळात काहींना दिलासा मिळू शकतो, तर काहींना आत्मपरीक्षणाची वेळ येऊ शकते. मात्र, धनु, कुंभ आणि मीन या तीन राशींना यावेळी सकारात्मक संकेत मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

advertisement

धनु रास

धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ प्रगतीचा मानला जात आहे. आर्थिक बाबतीत स्थैर्य निर्माण होईल आणि उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होतील. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. घरगुती सुखसोयींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो, मात्र जोखीम पत्करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अनावश्यक कर्ज देणे टाळावे, अन्यथा पैसे अडकण्याची शक्यता आहे. मानसिक स्थैर्य राखून सकारात्मक दृष्टीकोन ठेवला तर हा काळ अधिक लाभदायक ठरेल.

advertisement

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनिचा अस्त अनपेक्षित धनलाभाचे योग निर्माण करू शकतो. व्यवसायात विस्ताराची संधी मिळेल. विशेषतः मार्केटिंग, विक्री, संवाद कौशल्याशी संबंधित क्षेत्रांत कार्यरत असलेल्यांना चांगले यश मिळू शकते. केलेल्या मेहनतीचे फळ या काळात मिळण्याची चिन्हे आहेत. मार्च महिन्यात नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल ठरू शकतो. आत्मविश्वास वाढेल आणि निर्णयक्षमता अधिक ठाम होईल.

advertisement

मीन रास

शनि स्वतः मीन राशीत अस्त होत असल्याने मीन राशीच्या व्यक्तींवर त्याचा वेगळा परिणाम जाणवू शकतो. आत्मविश्वास आणि मानसिक ताकद वाढण्याची शक्यता आहे. नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची प्रेरणा मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल आणि प्रतिमा अधिक मजबूत होईल. एखाद्या नव्या प्रकल्पाची किंवा कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ पोषक ठरू शकतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
3 वर्षांपूर्वी घरीच सुरुवात, कवठ जाम विक्री व्यवसाय भारीच, महिन्याला एवढी कमाई
सर्व पहा

(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)

मराठी बातम्या/अध्यात्म/
ह्याला म्हणतात नशीब! होळी संपताच ३० वर्षांनी या ३ राशींचा गोल्डन टाइम झाला सुरू, सुखशांतीसह आर्थिक भरभराट होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल