वास्तविक, स्वाक्षरी नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही प्रकारे पाहिली जाते. स्वाक्षरीच्या खाली काढलेली रेषा योग्य की अयोग्य? स्वाक्षरी काढण्याविषयी वास्तुशास्त्र काय सांगतं आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? जाणून घेऊया ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून.
रेषा स्वाक्षरीपेक्षा मोठी असावी -
स्वाक्षरीबाबत वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आपण सही केल्यानंतर एक रेषा काढू शकता. पण लक्षात ठेवा की, तुम्ही स्वाक्षरीच्या खाली रेषा काढत असाल तर ती तुमच्या स्वाक्षरीपेक्षा मोठी असावी. यासह ही रेषा सरळ असावी.
advertisement
पतीची प्रगती होऊ देत नाहीत अशा महिला; या वाईट सवयी वेळीच दूर करा
तिरकी रेषा म्हणजे प्रगतीत अडथळा -
आपण स्वाक्षरीखाली रेषा काढत असाल आणि ती वाकडी असेल तर ते तुमच्यासाठी हानिकारक आहे. वास्तुशास्त्रानुसार, वाकडी रेषा तुमच्या स्वाक्षरीचा मार्ग कट करते आणि जर तुमची स्वाक्षरी कट होत असेल तुमच्या प्रगतीमध्ये अडचणी आणते.
एकापेक्षा जास्त रेषा मारू नका -
अनेकजण स्वाक्षरी केल्यानंतर एकापेक्षा जास्त रेषा काढतात. असे करणे चुकीचे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, स्वाक्षरीच्या खाली एकापेक्षा जास्त ओळींचा अर्थ जीवनात गोंधळ समजला जातो. म्हणजे तुम्ही कधीही योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि नेहमी गोंधळातच राहाल.
'जिभेवर साखर' असलेली माणसं या राशींची असतात; वाणीतून हमखास छाप पाडतात
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)