Chanakya Niti Tips: पतीची प्रगती होऊ देत नाहीत अशा महिला; या वाईट सवयी वेळीच दूर करा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Chanakya Niti Tips: चाणक्य नीतीनुसार, महिलांनी त्यांच्या पतीसोबत काही गोष्टी करणं टाळलं पाहिजे. याचा संसारावर विपरित परिणाम होऊ शकतो. नात्यात दुरावा निर्माण होतो. वैवाहिक जीवनात सतत संघर्ष असलेला माणूस बाहेर कोणतंच काम नीट करू शकत नाही, त्याची प्रगती खुंटते. जाणून घेऊ कोणत्या गोष्टी महिलांनी किंबहुना पुरुषांनीही टाळणे गरजेचे आहे.
सतत संशय घेणं - अनेक महिला आपल्या पतीचा सतत संशय घेत असतात. काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा खात्री करून घेतली पाहिजे. पण, सतत प्रत्येक गोष्टीत संशय घेण्याची सवय योग्य नाही. यामुळे पतीला राग येतो आणि कामावरही परिणाम होतो, तो त्याचं काम नीट, लक्षपूर्वक करू शकणार नाही. किंवा याहून अधिक गंभीर संकटांचे प्रसंग उद्भवू शकतात.
advertisement
सकाळी उशिरा उठणे - महिला असो की, पुरुष कोणाचीही सकाळी उशिरापर्यंत झोपण्याची सवय आयुष्यात प्रगती होऊ देत नाही. दोघांपैकी कोणीही एक सकाळी उशिरापर्यंत झोपत असेल, तर याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर दिसून येतो. सकाळी लवकर उठून सांसारिक कामे झटपट आटोपून इतर कामांसाठी दिवसाचा वेळ राखून ठेवणाऱ्याची लवकर प्रगती होते.
advertisement
advertisement
advertisement
छोट्या-छोट्या गोष्टींवर टोमणे मारणे - पतीच्या छोट्या-छोट्या गोष्टींवर टोमणे मारणे, टोचून बोलण्याची सवय महिलांनी सोडून द्यावी.यामुळे पतीला राग येतो आणि एकूण कामावर परिणाम होतो. यामुळे पतीला सतत असं वाटत राहतं की, पत्नी आपल्याला जराही समजून घेत नाही आणि प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी ती आपल्यालाच जबाबदार धरत आहे.