तुम्हाला आर्थिक समस्या जाणवत असतील तर त्या सुटण्यासाठी लक्ष्मीमातेची आराधना करावी. यासाठी शुक्रवारी मनोभावे लक्ष्मीपूजन करावं. शुक्रवारचा संबंध शुक्र ग्रहाशी जोडला जातो. हा ग्रह धन आणि प्रेमाचा कारक आहे. या दिवशी तुम्ही काही खास उपाय करू शकता. यामुळे लक्ष्मीमाता प्रसन्न होते. तसंच शुक्र ग्रहदेखील मजबूत होतो.
कोणत्या दिशेला ठेवावी गणपतीची मूर्ती? वाचा सविस्तर नाहीतर होईल खूप मोठं नुकसान
advertisement
शुक्रवारी लक्ष्मीमातेच्या मंदिरात शंख, कवड्या, कमळ, मखाना आणि बत्तासे अर्पण करावेत. यामुळे धनलाभ होऊ शकतो. ज्या घरात स्वच्छता असते, तिथे लक्ष्मीमाता वास करते असं मानलं जातं. त्यामुळे दर शुक्रवारी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करावा. दारासमोर गंगाजल शिंपडावं. तसंच दरवाज्यावर शुभ-लाभ आणि स्वस्तिक काढावं.
शुक्रवारी तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन गरीब, गरजूंना वस्त्रदान करू शकता. यामुळेदेखील लक्ष्मीमाता प्रसन्न होते. शुक्रवारी सकाळी गायीला चपाती खायला द्यावी. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि तिची कृपादृष्टी कायम राहते. सायंकाळची वेळ ही लक्ष्मीमाता येण्याची वेळ असते. या वेळी घरातले सर्व दिवे सुरू ठेवावेत. कर्जमुक्तीसाठी शुक्रवारी पिवळ्या कापड्यात पाच कवड्या आणि एक चांदीचं नाणं बांधून ते तिजोरीत ठेवावं. यामुळे धनाचं आगमन होऊ लागतं आणि जुन्या कर्जातून मुक्ती मिळते.
Ganesh Chaturthi 2024: अष्टविनायकाच्या 8 गणपतींचा हा आहे इतिहास! तुम्हाला माहिती आहे का?
लक्ष्मीमातेला कमळाचं फूल प्रिय आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी स्नान केल्यावर पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करावं. लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करून तिला कमळाचं फूल अर्पण करावं. यामुळे धनलाभ होऊ शकतो. तसंच आर्थिक समस्या सुटू शकतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)