TRENDING:

Shri Ram Jyoti: संध्याकाळी दिव्यांनी उजळेल संपूर्ण भारत देश! घरी अशा पद्धतीनं प्रज्वलित करा रामज्योती

Last Updated:

Shri Ram Jyoti: प्रत्येक घर राममय झाले आहे. दुपारी प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर श्री रामज्योती प्रज्वलित होईल. श्री रामज्योती कधी-कशी प्रज्वलित करावी याविषयी तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव सांगत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 22 जानेवारी : अयोध्येतील भव्य राम मंदिरात आज दुपारी मृगाशिरा नक्षत्र आणि अभिजीत मुहूर्तावर रामललाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. या शुभ प्रसंगी आज देशभरात दिवाळी साजरी होणार आहे. त्रेतायुगात प्रभु श्रीराम लंका जिंकून माता सीता, बंधू लक्ष्मण, वीर हनुमान इत्यादींसह अयोध्येला पोहोचले होते. तेव्हा प्रत्येक घरा-घरात आनंदानं दिवे प्रज्वलित करण्यात आले. आज पुन्हा एकदा अयोध्येमध्ये उत्सव साजरा होत असून संपूर्ण देश रामाचा जयघोष करत आहे. प्रत्येक घर राममय झाले आहे. दुपारी प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर श्री रामज्योती प्रज्वलित होईल. श्री रामज्योती कधी-कशी प्रज्वलित करावी याविषयी तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव सांगत आहेत.
News18
News18
advertisement

श्रीराम ज्योती प्रज्वलित करावी -

ज्योतिषी डॉ. भार्गव सांगतात की, दिवाळी हा सण प्रदोषकाळात साजरा केला जातो, म्हणजेच सूर्यास्तानंतर अंधार पडू लागतो, तेव्हापासूनच प्रकाश देण्याची गरज असते. आजच्या दिवशी प्रदोष काळात श्री रामज्योती लावा. प्रदोष काळापासून रात्रभर श्रीराम ज्योती प्रज्वलित करावी.

श्रीराम ज्योती प्रज्वलित करण्याची वेळ?

आज सूर्यास्त संध्याकाळी 05:52 वाजता होईल. त्यानंतर प्रदोष कालावधी सुरू होतो आणि रात्रीच्या प्रारंभापर्यंत मानला जातो. ठिकाणानुसार सूर्यास्ताच्या वेळांमध्ये बदल होत असतो. त्यामुळे सर्वसाधारणपणे सूर्यास्तानंतर किंवा अंधार पडू लागल्यावर श्रीराम ज्योती लावावी.

advertisement

रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मंदिराच्या आतील Exclusive PHOTO

श्रीराम ज्योती कशी प्रज्वलित करावी?

पूजेच्या ठिकाणी ईशान्य दिशेला सुंदर रांगोळी काढावी. रांगोळीच्या मध्यभागी सप्तधान्य ठेवा. नंतर मातीचा दिवा मोहरी किंवा तिळाच्या तेलाने भरा. त्यात कापसाची वात घाला. प्रभू रामललाचे स्मरण करून हा दिवा लावा. तो रांगोळीच्या मध्यभागी ठेवा. हा दिवा रात्रभर तेवत राहील याची काळजी घ्या.

advertisement

4 शुभ संयोगाने श्री रामज्योती प्रज्लवलन -

श्री राम ज्योती प्रज्वलित करताना सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, इंद्र योग, मृगाशिरा नक्षत्र असेल. यामध्ये तुम्ही प्रभु रामाकडे जी प्रार्थना कराल ती पूर्ण होईल. सर्वार्थ सिद्धी योगात केलेले कार्य यशस्वी ठरते.

जय श्रीराम! आज प्राण-प्रतिष्ठापनेचा दिवस! घरी अशी करा पूजा, मंत्र, आरती, शुभ योग

advertisement

दिवा लावताना म्हणण्याचा मंत्र -

शुभम करोति कल्याणं, आरोग्यं धन संपदाम्

शत्रु बुद्धि विनाशा, दीपं ज्योति नमोस्तुते.

देशभरात दिवाळीसारखा सण -

रामललाच्या प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने संपूर्ण देशात दिवाळीसारखा आनंदोत्सव साजरा होत आहे. प्रत्येक मंदिर, घर, बाजार, चौक, रस्ता आणि परिसर दिव्यांनी, फुलांनी आणि भगव्या ध्वजांनी सजलेला आहे. दुकानांमध्ये दिवे आणि फटाके विकले जात आहेत. लोक आज घरोघरी श्री रामज्योती लावून उत्सव साजरा करतील.

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
Shri Ram Jyoti: संध्याकाळी दिव्यांनी उजळेल संपूर्ण भारत देश! घरी अशा पद्धतीनं प्रज्वलित करा रामज्योती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल