TRENDING:

कोणत्या दिशेला ठेवावी गणपतीची मूर्ती? वाचा सविस्तर नाहीतर होईल खूप मोठं नुकसान

Last Updated:

दरवर्षी दीड, पाच, सात आणि दहा दिवसांसाठी घरोघरी श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. काही लोक कायमस्वरूपी घरामध्ये श्री गणेश मूर्ती ठेवतात. मात्र तसं करणार असाल तर हे वाचा..

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हिंदू धर्मात श्री गणपती हे सुख, समृध्दी आणि वैभवाचं प्रतीक मानलं जातं. दरवर्षी दीड, पाच, सात आणि दहा दिवसांसाठी घरोघरी श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. काही लोक कायमस्वरूपी घरामध्ये श्री गणेश मूर्ती ठेवतात. मात्र श्री गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगानं हिंदू धर्मशास्रांत काही नियम दिले आहेत. घरात श्री गणेश मूर्ती एका विशिष्ट दिशेलाच ठेवावी असं सांगितलं जातं.
News18
News18
advertisement

श्री गणरायाची मूर्ती घरात ठेवल्यानं कोणत्याही प्रकारचा क्लेश, दुःख निर्माण होत नाही, तसेच कोणतंही विघ्न किंवा संकट येत नाही, असं मानलं जातं. परंतु, यासाठी गणपतीची मूर्ती घरात योग्य दिशेला ठेवणं महत्त्वाचं असतं. धर्मशास्रानुसार, घरामध्ये श्री गणेश मूर्तीची पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच प्राणप्रतिष्ठा करावी. तसेच तुमच्या घराबाहेर जर एखादं झाड असेल तर त्याखाली देखील तुम्ही श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा करू शकता. विशेषतः पिंपळ, आंबा किंवा लिंबाच्या झाडाखाली श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं शुभ मानलं जातं. जर तुम्ही श्री गणेश मूर्ती दक्षिण दिशेला ठेवली तर घरात नकारात्मकता वाढण्याची शक्यता असते. तसेच तुम्ही तुमच्या देवघरात श्री गणेशाची एकच मूर्ती ठेवणं योग्य असतं.

advertisement

Ganesh Chaturthi 2024: अष्टविनायकाच्या 8 गणपतींचा हा आहे इतिहास! तुम्हाला माहिती आहे का?

घरामध्ये श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लाकडाच्या टेबलावर करू शकता. तसेच श्री गणरायाच्या चरणी एक वाटी तांदूळ अर्पण केले तर तुमचं भाग्य तुम्हाला नक्कीच साथ देईल, असं मानलं जातं. घरातील जिन्याखाली कदापि श्री गणेश मूर्ती ठेवू नये, कारण त्या जिन्यावरून आपण चालतो आणि त्याखाली मूर्ती ठेवल्यास श्री गणेशाचा अपमान होतो. तसेच खोलीत ज्या ठिकाणी तुम्ही झोपता आणि तुमचे पाय ज्या दिशेला असतात, त्याच्या आसपास श्री गणेशाची मूर्ती ठेवू नये. या ठिकाणी मूर्ती ठेवणं अशुभ मानलं जातं.

advertisement

सप्टेंबर महिन्यातलं चंद्रग्रहण भारतातून दिसेल का? जाणून घ्या ग्रहणाचा कालावधी

ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी जर तुम्हाला श्री गणेशाची मूर्ती ठेवायाची असेल किंवा तिची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर ती मूर्ती कधीही बसलेल्या स्वरुपात नसावी. श्री गणेशाच्या मूर्तीचा विचार केला तर शास्त्रानुसार, गायीच्या शेणापासून बनवलेली गणेश मूर्ती अत्यंत शुभ मानली जाते. अशी मूर्ती जर तुम्ही घरात ठेवली तर घरात दुःख कधीच येत नाही, असं मानलं जातं. घरात धातुंची गणेश मूर्ती ठेवली तर सर्व प्रकारच्या वास्तुदोषांपासून मुक्ती मिळते. हळदीपासून बनवलेली श्री गणेश मूर्ती घरात ठेवल्यास भाग्याची तुम्हाला नेहमीच साथ मिळू शकते.

advertisement

श्री गणराय हे मांगल्याचं प्रतीक असल्यानं, श्री गणरायाच्या आगमनानं घरात उत्साह, आनंद, सुख, शांती येते. त्यामुळे श्री गणेश मूर्तीची रचना आणि ती ठेवण्याच्या ठिकाणांविषयी नियमांचं पालन केल्यास श्री गणरायाचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

advertisement

मराठी बातम्या/अध्यात्म/
कोणत्या दिशेला ठेवावी गणपतीची मूर्ती? वाचा सविस्तर नाहीतर होईल खूप मोठं नुकसान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल