अयोध्या येथील ज्योतिषी पंडित कल्की राम यांच्या मते, आषाढ पौर्णिमा तिथी 9 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी सुरू होईल आणि 10 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी समाप्त होईल. उदय तिथीनुसार, आषाढ महिन्याची पौर्णिमा 10 जुलै रोजी आहे. याच दिवशी गुरुपौर्णिमा उत्सवही साजरा केला जाईल.
पौर्णिमेच्या दिवशी पूजेचे महत्त्व
advertisement
पंडित कल्की राम यांनी सांगितले की, पौर्णिमा तिथीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. असं मानलं जातं की, या दिवशी पवित्र पाण्यात स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होतं. तसेच, या दिवशी वस्त्र, धन इत्यादी दान करावं. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसाठी व्रत ठेवावं आणि विधीनुसार पूजा करावी. असं केल्याने जीवनात सुख-समृद्धी राहते आणि माता लक्ष्मी तसेच भगवान विष्णू यांचा विशेष आशीर्वाद मिळतो.
गुरुपौर्णिमा कधी आहे?
आषाढ पौर्णिमा तिथीच्या दिवशी गुरुपौर्णिमा उत्सव देखील साजरा केला जाईल. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासोबतच आपल्या गुरूंचीही पूजा करावी. असं म्हटलं जातं की, जीवनात गुरू असणं खूप महत्त्वाचं आहे आणि गुरूंची पूजा केल्याने जीवनात पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होतो.
हे ही वाचा : Vastu tips: घरी पोपट पाळणे शुभ की अशुभ? उज्जैनच्या आचार्यांकडून जाणून घ्या नियम आणि महत्त्व!
हे ही वाचा : आषाढातील 'हा' दिवस आहे खास! पूत्र प्राप्तीचं मिळेल सुख अन् शूत्र स्वतःहून होतील पराभूत, जाणून घ्या पूजा विधी!