आषाढातील 'हा' दिवस आहे खास! पूत्र प्राप्तीचं मिळेल सुख अन् शूत्र स्वतःहून होतील पराभूत, जाणून घ्या पूजा विधी!

Last Updated:

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी ‘स्कंद षष्ठी’ म्हणून ओळखली जाते. हा दिवस भगवान शिव व पार्वती यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे. पंडित श्रीधर शास्त्री यांच्या मते...

Skanda Shashti 2025
Skanda Shashti 2025
Skanda Shashti 2025 : आषाढ महिन्यात येणारी शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी खूप खास आणि विशेष फळ देणारी आहे. हा दिवस भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र कार्तिकेय यांना समर्पित आहे. वर्षभरात येणाऱ्या शुक्ल पक्षातील सर्व षष्ठी तिथी भगवान कार्तिकेय यांना समर्पित असल्या तरी, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष तिथीचं व्रत योग्य विधीपूर्वक केल्याने विशेष आणि महत्त्वपूर्ण फळ मिळतं. धार्मिक ग्रंथांनुसार, हे व्रत योग्य विधीपूर्वक केल्याने शत्रूंवर विजय, संतान प्राप्ती, ज्ञान प्राप्ती आणि रोगांपासून मुक्ती मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे.
शत्रू स्वतःहून पराभूत होतात
स्कंद षष्ठीबद्दल, हरिद्वारचे विद्वान ज्योतिषी पंडित श्रीधर शास्त्री सांगतात की, जर आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीचं व्रत योग्य विधीपूर्वक केलं, तर शत्रू स्वतःहून पराभूत होतात. यामुळे शिक्षण मिळण्यातील अडथळे दूर होतात. अगदी गंभीर आजारही बरे होतात आणि संतान प्राप्तीबद्दलच्या चिंता संपतात.
या दिवशी या गोष्टी आवर्जुन करा
पंडित श्रीधर शास्त्री सांगतात की, यावर्षी स्कंद षष्ठीचं व्रत आषाढ शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला म्हणजेच सोमवारी, 30 जून रोजी केलं जाईल. स्कंद षष्ठीचं व्रत करण्यासाठी, सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठा, स्नान वगैरे करून काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, आळस इत्यादी सर्व वाईट गोष्टींचा त्याग करून हे व्रत करण्याचा संकल्प करा. दिवसभर फक्त फळं खा.
advertisement
या दिवशी आपल्या पूजास्थानी भगवान कार्तिकेय यांच्यासोबत माता गौरी आणि भगवान शिव यांची मूर्ती स्थापित करा, धूप लावा आणि देवाला चंदन, तांदूळ, फळं, फुलं अर्पण करा. पूजेदरम्यान भगवान कार्तिकेय यांच्या "ओम स्कंदाय नमः", "ओम कुमारया नमः", "ओम सुब्रह्मण्याय नमः" या तीन मंत्रांचा 108 वेळा जप केल्याने इच्छित फळ मिळतं.
advertisement
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
आषाढातील 'हा' दिवस आहे खास! पूत्र प्राप्तीचं मिळेल सुख अन् शूत्र स्वतःहून होतील पराभूत, जाणून घ्या पूजा विधी!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement