Vastu tips: घरी पोपट पाळणे शुभ की अशुभ? उज्जैनच्या आचार्यांकडून जाणून घ्या नियम आणि महत्त्व!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
हिंदू धर्मानुसार प्राणी व निसर्गाला विशेष महत्त्व आहे. पोपट हा घरात ठेवल्यास शुभ परिणाम देणारा पक्षी मानला जातो. वास्तूनुसार...
हिंदू धर्मात निसर्गासोबतच प्राण्यांनाही शास्त्रांमध्ये विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. बहुतेक लोकांना घरात कुत्रा, मांजर, मासे, ससे आणि पोपट यांसारखे प्राणी आणि पक्षी पाळण्याची आवड असते. पाळीव प्राणी घरात ठेवल्याने सकारात्मक वातावरण टिकून राहतं, असं अनेकांचं मत आहे. काहींना पोपट पाळायला आवडतं, पण घरात पोपट पाळणं शुभ की अशुभ याबद्दल लोकांना अनेकदा संभ्रम असतो. उज्जैनचे आचार्य आनंद भारद्वाज यांच्याकडून याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया...
वास्तुशास्त्र काय सांगतं?
जर तुमच्याही घरात पोपट असेल, तर वास्तूनुसार त्याला घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावं. कारण उत्तर दिशा बुधाची दिशा मानली जाते, जी बुद्धी आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. अशा स्थितीत तुम्ही पोपट उत्तर दिशेला ठेवल्यास मुलांना अभ्यासात सकारात्मक परिणाम मिळतात. तर पूर्व दिशा सूर्यदेवाची दिशा मानली जाते आणि या दिशेतून घरात सुख-समृद्धी येते.
advertisement
- घराच्या उत्तर दिशेला पोपट ठेवणे शुभ मानलं जातं. यामुळे मुलांना अभ्यासात जास्त लक्ष लागतं, एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते. पोपट ठेवल्याने पती-पत्नीमधील संबंध मजबूत होतात.
- वास्तुशास्त्रानुसार, घरात पोपट ठेवल्याने घरातील लोक कमी आजारी पडतात आणि निराशेचं वातावरण निर्माण होत नाही.
- जर तुम्ही पोपट पिंजऱ्यात ठेवला असेल, तर पोपट आनंदी राहील याची काळजी घ्या. कारण अनेक मान्यतांनुसार, पोपट पिंजऱ्यात आनंदी नसेल तर घरात नकारात्मकता येऊ लागते.
advertisement
हे ही वाचा : Shravan month 2025: श्रावण महिन्यात जन्मलेली माणसं साधी-सुधी असली तरी 'अशा' गोष्टींमध्ये पारंगत
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 30, 2025 10:15 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vastu tips: घरी पोपट पाळणे शुभ की अशुभ? उज्जैनच्या आचार्यांकडून जाणून घ्या नियम आणि महत्त्व!