advertisement

डोंबिवलीकरांचा डंका थेट लंडनपर्यंत! ९,१११ महिलांनी लेझीम खेळत सांगलीचा रेकॉर्ड मोडला; गिनीज बुकमध्ये नोंद

Last Updated:

डोंबिवलीत ९,१११ महिलांनी सामूहिक लेझीम वादन करून 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' प्रस्थापित केला. सांगलीचा ७,३३८ महिलांचा जुना विक्रम मोडला. आमदार रवींद्र चव्हाण यांनी हा विक्रम भारत मातेच्या चरणी अर्पण केला.

News18
News18
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीच्या शिरपेचात आज मानाचा तुरा रोवला गेला आहे. कल्याण-डोंबिवलीतील तब्बल ९ हजार १११ महिला आणि विद्यार्थिनींनी एकत्र येत सामूहिक लेझीम वादनाचा नवा 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' प्रस्थापित केला आहे. या अभूतपूर्व कामगिरीने सांगलीकरांचा ७,३३८ महिलांच्या लेझीम वादनाचा जुना विक्रम इतिहासजमा झाला असून, डोंबिवलीच्या रणरागिणींनी जागतिक स्तरावर आपली ताकद दाखवून दिली आहे.
सावळाराम क्रीडा संकुलात लेझीमचा गजर
डोंबिवलीतील श्री संत सावळाराम क्रीडा संकुल रविवारी पहाटेपासूनच भगव्या आणि सांस्कृतिक रंगात न्हाऊन निघाले होते. 'डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार' आणि 'कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समिती' यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे जिल्ह्यातील शेकडो शाळांमधील विद्यार्थिनी आणि विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी साडेपाच मिनिटे लेझीमची एकाच तालात प्रात्यक्षिके सादर केली. हा नयनरम्य सोहळा पाहून उपस्थित हजारो नागरिक थक्क झाले.
advertisement
सांगलीचा विक्रम मोडीत; लंडनहून आली पावती
याआधी सामूहिक लेझीम वादनाचा विक्रम सांगलीच्या नावावर होता, जिथे ७,३३८ महिलांनी सहभाग नोंदवला होता. मात्र, डोंबिवलीत हा आकडा ९,१११ वर पोहोचल्याचे 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'चे लंडनहून आलेले प्रतिनिधी स्वप्नील डांगरेकर यांनी अधिकृतपणे जाहीर केले. त्यांनी या विक्रमाचे प्रमाणपत्र सुहासिनी रवींद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले.
हा विक्रम 'भारत मातेच्या' चरणी अर्पण!
advertisement
या ऐतिहासिक क्षणी आमदार रवींद्र चव्हाण भावूक झाले होते. "लेझीम ही आपली संस्कृती आहे आणि ती टिकवणे आपले कर्तव्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशक्त भारताचा जो संकल्प सोडला आहे, त्यालाच अनुसरून डोंबिवलीतील माता-भगिनींनी हा पराक्रम केला आहे. हा जागतिक विक्रम मी भारत मातेच्या चरणी समर्पित करतो," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
advertisement
जय श्रीरामच्या घोषणांनी आसमंत दणाणला
विक्रमाची अधिकृत घोषणा होताच संपूर्ण मैदान 'भारत माता की जय' आणि 'जय श्रीराम'च्या घोषणांनी दणाणून गेले. ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या झुंकारात महिलांनी आपला आनंद व्यक्त केला. जागतिक महिला दिनाचं यापेक्षा मोठं आणि ऐतिहासिक सेलिब्रेशन दुसरं असूच शकत नाही, अशी चर्चा संपूर्ण डोंबिवलीत रंगली आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
डोंबिवलीकरांचा डंका थेट लंडनपर्यंत! ९,१११ महिलांनी लेझीम खेळत सांगलीचा रेकॉर्ड मोडला; गिनीज बुकमध्ये नोंद
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement