ज्येष्ठ पौर्णिमा कधी आहे?
यावर्षी ज्येष्ठ पौर्णिमा मंगळवार, 10 जून रोजी सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी सुरू होईल आणि बुधवार, 11 जून रोजी दुपारी 1 वाजून 13 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार, ज्येष्ठ पौर्णिमा 11 जून रोजी साजरी केली जाईल.
तुळशीचे उपाय जे बदलतील तुमचं नशीब...
घरातील कटकट आणि अशांतता दूर करण्यासाठी : जर तुमच्या घरात सतत वाद-विवाद होत असतील, घरात शांतता नसेल, तर ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी एक नवीन तुळशीचं रोप आणा आणि ते उत्तर, ईशान्य (उत्तर-पूर्व) किंवा पूर्व दिशेला लावा. असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक, दैवी स्पंदनं वाढतात.
advertisement
अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी आणि प्रगतीसाठी : जर तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत अडचणी येत असतील, पैसे अडकले असतील, तर तुळशीची एक फांदी पिवळ्या कपड्यात बांधून तुमच्या पैशांच्या ठिकाणी, म्हणजे ऑफिस, दुकान किंवा तिजोरीत ठेवा. यामुळे अडकलेले पैसे परत मिळतात, तसेच करिअरमध्ये प्रगती होेते.
आर्थिक संकट दूर करण्यासाठी : तुळशीची पूजा दररोज केली पाहिजे. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुळशीची 11 पानं तोडा (पानं तोडण्यापूर्वी तुळशी मातेची माफी नक्की मागा). ही पानं एका लाल कपड्यात बांधून घराच्या मुख्य दरवाज्याच्या चौकटीवर लावा. या उपायाने आर्थिक संकट दूर होत नाही, तर माता लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो.
हे ही वाचा : असा योग पुन्हा नाहीच! 9 जूनपासून या 5 राशींच्या लोकांचे नशीब पलटणार, हाती पैसाच पैसा येणार
हे ही वाचा : Sonam : सोनम निघाली बेवफा, कसा असतो S अक्षर असलेल्या मुलींचा स्वभाव?