Sonam : सोनम निघाली बेवफा, कसा असतो S अक्षर असलेल्या मुलींचा स्वभाव?
- Published by:Priya Lad
Last Updated:
S Name personality : ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या नावाचं पहिलं अक्षर त्या व्यक्तीच्या कारकिर्दीबद्दल, व्यक्तिमत्त्वाबद्दल, स्वभावाबद्दल, प्रेमाबद्दल आणि वैवाहिक जीवनाबद्दल सांगू शकतं. सोनम नाव चर्चेत असल्याने S नावाच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो पाहुयात.
नवी दिल्ली : सोनम, सोनम, सोनम... सध्या सगळीकडे चर्चेत असलेलं हे नाव. पती राजासोबत हनीमूनला गेलेली सोनम कित्येक दिवसांपासून बेपत्ता होती. अखेर ती सापडली. तिचा पती राजाचा मृतदेह सापडला होता आणि तिनेच त्याची हत्या केल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे सोनम चांगलीच चर्चेत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या नावाचं पहिलं अक्षर त्या व्यक्तीच्या कारकिर्दीबद्दल, व्यक्तिमत्त्वाबद्दल, स्वभावाबद्दल, प्रेमाबद्दल आणि वैवाहिक जीवनाबद्दल सांगू शकतं. सोनम नाव चर्चेत असल्याने S नावाच्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो पाहुयात.
अंकशास्त्रात असं म्हटलं जातं की प्रत्येक अक्षराची स्वतःची ऊर्जा आणि त्याच्याशी संबंधित गुण असतात. नावाचं पहिलं अक्षर एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वासोबतच त्याच्या स्वभावाबद्दल आणि इतर अनेक गोष्टींबद्दल सांगू शकते. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी S अक्षराने नाव सुरू होणाऱ्या लोकांच्या स्वभावाबद्दल आणि व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगितलं आहे.
S अक्षर असलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या लोकांचं नाव S अक्षराने सुरू होते ते आनंदी आणि मिलनसार मानले जातात. हे लोक जितके आनंदी असतात तितकेच ते रागिष्टही असतात. हे लोक छोट्या छोट्या गोष्टींवर लवकर रागावतात, परंतु त्यांच्या समजुतीनुसार ते लवकर शांत देखील होतात. ज्या लोकांचं नाव S अक्षराने सुरू होतं त्यांना स्वतःवर नियंत्रण कसं ठेवावं हे चांगले माहित असतं.
advertisement
ज्या लोकांचे नाव इंग्रजीत S अक्षराने सुरू होते ते स्वाभिमानी मानले जातात. त्यांना कोणाचीही मदत घेणं आवडत नाही. हे लोक नेहमीच ते जे काही काम करतात ते स्वतःहून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या स्वभावामुळे ते इतर लोकांवर वेगळी छाप सोडतात.
advertisement
करिअर कसं असतं?
ज्या लोकांचे नाव इंग्रजी अक्षर S ने सुरू होते ते बहुतेकदा नेतृत्व करताना दिसतात. हे लोक कार्यक्षम नेते बनू शकतात. त्यांना कोणाच्याही हाताखाली काम करायला आवडत नाही. त्यांना स्वतःच्या इच्छेनुसार काम करणं सोयीस्कर वाटतं. बोलण्यापूर्वी त्यांना सर्वकाही कसं तोलायचं हे माहित असतं. याचा अर्थ असा की ते जे काही बोलतात ते ते विचार करूनच बोलतात. त्यांच्या या वैशिष्ट्यांमुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि ते त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करतात.
advertisement
वैवाहिक जीवन कसं असतं?
ज्या लोकांचे नाव S अक्षराने सुरू होतं ते स्वभावाने गंभीर आणि संवेदनशील असतात. ते त्यांच्या प्रियजनांचा खूप आदर करतात आणि त्यांच्यासाठी पूर्णपणे समर्पित असतात. ते त्यांच्या जोडीदाराला त्यांचं पूर्ण प्रेम देण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन आनंदी असतं. तसंच हे लोक काही प्रसंगी रोमँटिक होतात.
Location :
Delhi
First Published :
June 09, 2025 9:53 AM IST