advertisement

आधी जमीन NA अट रद्द करण्याचा निर्णय! आता बांधकाम परवानगीसाठी 'हे' डॉक्युमेंट असणार अनिवार्य

Last Updated:

NA Land Rules : राज्य सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (२०२५ सुधारणा) अंतर्गत मोठा प्रशासकीय बदल करत अकृषक (एनए) परवानगीची सक्ती रद्द केली आहे.

NA Land
NA Land
मुंबई : राज्य सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (२०२५ सुधारणा) अंतर्गत मोठा प्रशासकीय बदल करत अकृषक (एनए) परवानगीची सक्ती रद्द केली आहे. महसूल विभागाच्या १० फेब्रुवारीच्या आदेशानुसार, शेतजमिनीवर घर, इमारत किंवा कोणताही प्रकल्प उभारताना महसूल विभागाकडून स्वतंत्र एनए परवानगी घेण्याची आवश्यकता आता राहणार नाही.
‘मानीव अकृषक’ संकल्पना लागू
नव्या नियमानुसार, संबंधित नियोजन प्राधिकरणाने बांधकाम नकाशा मंजूर केला की ती जमीन आपोआप ‘मानीव अकृषक’ (Deemed NA) समजली जाईल. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र एनए सनद घेण्याची अट रद्द करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या आणि दुहेरी प्रक्रियेतून मोठा दिलासा मिळणार आहे.
यासोबतच दरवर्षी आकारला जाणारा अकृषक कर कायमचा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे जमीनधारकांना वार्षिक कर भरण्याच्या त्रासातून मुक्ती मिळणार आहे.
advertisement
एकरकमी रूपांतरण अधिमूल्य
वार्षिक कराऐवजी आता रेडीरेकनरच्या चालू बाजार मूल्यानुसार एकदाच रूपांतरण अधिमूल्य भरावे लागेल. त्याची टक्केवारी पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे:
१००० चौ.मी.पर्यंतच्या भूखंडासाठी – बाजार मूल्याच्या ०.१० टक्के
१००१ ते ४००० चौ.मी. – ०.२५ टक्के
४००० चौ.मी.पेक्षा जास्त (एक एकरपेक्षा अधिक) – ०.५० टक्के
या एकरकमी शुल्कामुळे भविष्यातील कराची चिंता संपुष्टात येणार आहे.
advertisement
जुन्या मालमत्तांसाठी स्वतंत्र तरतूद
३१ डिसेंबर २००१ पूर्वी अकृषक झालेल्या जमिनींसाठी २००१ च्या बाजार मूल्यानुसार एकरकमी शुल्क आकारले जाईल. तर १ जानेवारी २००२ नंतरच्या जमिनींसाठी बांधकाम परवानगीच्या वेळच्या बाजार मूल्यानुसार अधिमूल्य निश्चित केले जाईल.
महसूल वाटपाची रचना
शुल्क वसुलीची विभागणी स्पष्ट करण्यात आली आहे. ‘अ’ वर्ग महापालिका क्षेत्रात ३० टक्के रक्कम महापालिकेला तर ७० टक्के शासनाला दिली जाईल. इतर महापालिका व नगरपालिकांमध्ये ५०-५० टक्के वाटप होईल. ग्रामपंचायत क्षेत्रात ५० टक्के रक्कम जिल्हा परिषदेला दिली जाईल, त्यातील २५ टक्के हिस्सा संबंधित ग्रामपंचायतीला मिळणार आहे.
advertisement
भोगवट वर्ग-२ जमिनींसाठी नियम कायम
भोगवट वर्ग-२ (नजराणा पात्र) जमिनींच्या बाबतीत मात्र सक्षम अधिकाऱ्याची परवानगी व नजराणा शुल्क भरणे अनिवार्य राहील. बांधकाम परवानगीसाठी अर्ज बीपीएमएस (BPMS) किंवा ऑटो डीसीआर प्रणालीद्वारे ऑनलाइन सादर करता येणार आहे.
गृहकर्ज प्रक्रियेला गती
अनेक बँका गृहकर्ज देताना स्वतंत्र एनए सनद मागत असत. शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर बँकांनी स्वतंत्र एनए सनदची अट घालू नये. जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश सर्व बँकांच्या निदर्शनास आणून देण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे गृहकर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद होण्याची अपेक्षा आहे.
advertisement
कोणाला होणार फायदा?
दुहेरी करप्रणाली संपुष्टात येणार, स्वतंत्र एनए परवानगीची गरज नाही. एकरकमी अधिमूल्यामुळे भविष्यातील करमुक्ती मिळेल. गृहकर्ज मंजुरीला वेग येईल.
महसूल व नगररचना विभागातील दुहेरी यंत्रणा कमी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयासाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले जाते. जमीनधारक शेतकरी, घरबांधणी करणारे नागरिक आणि रिअल इस्टेट क्षेत्रासाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
आधी जमीन NA अट रद्द करण्याचा निर्णय! आता बांधकाम परवानगीसाठी 'हे' डॉक्युमेंट असणार अनिवार्य
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement