Honeymoon : हनीमूनला गेलेल्या कपलसोबत घडतंय काय? राजा-सोनमसारखं आणखी एक कपल बेपत्ता

Last Updated:

Honeymoon couple missing : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील एक नवविवाहित जोडपं त्यांच्या हनीमूनसाठी सिक्कीमला गेलं होतं आणि 15 दिवसांनंतरही परत आलेलं नाही.

प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
लखनऊ : गेल्या काही दिवसांपासून राजा आणि सोनम हे नवविवाहित दाम्पत्य चांगलंच चर्चेत आलं. शिलाँगला हनीमूनला गेलेलं हे कपल अचानक बेपत्ता झालं. हळूहळू त्यांच्याबाबतचे अनेक गूढ उलगडत गेले. राजाचा मृतदेह सापडला तर बेपत्ता असलेली सोनम आता यूपीत सापडली आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आता राजा-सोनमसारखंच हनीमूनला गेलेलं आणखी एक कपल बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील एक नवविवाहित जोडपं, कौशल्येंद्र प्रताप सिंह आणि अंकिता सिंह अशी त्यांची नावं. 5 मे रोजी त्यांचं लग्न झालं. 24 मे रोजी हे दोघं हनीमूनसाठी सिक्कीमला गेले. 15 दिवस उलटूनही ते घरी परतलेले नाहीत.
29 मे रोजी संध्याकाळी भूस्खलनग्रस्त मंगन जिल्ह्यात ज्या कारमध्ये दोघं प्रवास करत होते, ती तीस्ता नदीत 1 हजार फूट खोलवर कोसळली. लाचेन-लाचुंग महामार्गावरील मुनसिथांगजवळ कार रस्त्यावरून घसरली. त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या नऊ जणांपैकी एकाचा मृत्यू झाला आणि दोन जखमी झाले. आठ प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत. या बेपत्तांमध्ये अंकिता आणि कौशल्येंद्र हे कपल आहे.
advertisement
जागरणच्या वृत्तानुसार कौशल्येंद्रच्या वडिलांनी सांगितलं की, "माझा मुलगा आणि सून यांची गाडी सिक्कीममध्ये नदीत कोसळल्यानंतर ते बेपत्ता आहेत. आम्ही घटनास्थळी अनेक वेळा भेट दिली आहे. घटनास्थळावरून ज्या काही वस्तू सापडल्या आहेत, त्यात माझ्या मुलाच्या आणि त्याच्या पत्नीच्या कोणत्याच वस्तू नाहीत. मी ते दोघं सापडल्याशिवाय घरी परतणार नाही."
advertisement
पुढे ते म्हणाले, "मी सर्वांना विनंती करतो की माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या आयुष्यासाठी प्रार्थना करा." मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या सिक्कीमच्या समकक्षांना शोध आणि बचाव कार्य जलद करण्याची विनंती करावी,"
बेपत्ता झालेल्या आठ पर्यटकांचा शोध एनडीआरएफ, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, वन विभाग, पर्यटन विभाग, टीएएएस (सिक्कीम ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन) आणि पोलिसांकडून घेतला जात आहे. खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.
मराठी बातम्या/Viral/
Honeymoon : हनीमूनला गेलेल्या कपलसोबत घडतंय काय? राजा-सोनमसारखं आणखी एक कपल बेपत्ता
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement