पंडितने काढला होता शुभमुहूर्त, पण त्याआधीच हनीमूनला गेलं कपल, घडलं भयंकर

Last Updated:

Raja Sonam honeymoon : सोनम आणि राजा हे कपल त्यांच्या लग्नाची तारीख ठरवणाऱ्या पंडितजींनी त्यांना विदाईच्या तारखेबाबतही सांगितलं होतं. पण त्यांनी ऐकलं नाही आणि त्याआधीच हनीमूनला गेलं.

News18
News18
मिथिलेश गुप्ता/इंदौर : लग्नानंतर घाई असते ती हनीमूनची. मध्य प्रदेशमधील असंच एक कपल लग्नानंतर हनीमूनला गेलं. पण त्यांच्या लग्नाचा मुहूर्त जसा काढला होता तशी पाठवणीची तारीखही पंडितजींनी काढली होती. पण त्याआधीच हे कपल हनीमूनला गेलं आणि त्यांच्यासोबत भयंकर घडलं. मध्य प्रदेशमधील ही घटना चांगलीच चर्चेत आली आहे.
इंदूरच्या बाणगंगा परिसरातील गोविंद कॉलनीत राहणारी सोनम रघुवंशी तिचा पती राजा रघुवंशीसोबत हनीमूनला शिलाँगला गेली होती. तिथं राजा संशयास्पद परिस्थितीत मरण पावला, तर सोनम अजूनही बेपत्ता आहे. या प्रकरणाने केवळ कुटुंबच नाही तर संपूर्ण परिसर चिंतेत आहे.
सोनम आणि राजाचं लग्नाचा 11 मेचा शुभमुहूर्त पंडित एनके पांडे यांनी काढला होता. त्याचवेळी त्यांनी विदाईसाठीही मुहूर्त काढला होता. जो 5 जूनचा होता. याआधी निघणं शुभ नव्हतं. पण सोनम आणि राजा यांनी याआधी प्रवास करण्याची योजना आखली होती आणि ते पूर्वेकडे म्हणजेच कामाख्या दर्शनासाठी निघाले. तिथून ते शिलाँगला पोहोचले.
advertisement
पंडित एन.के. पांडे यांच्या मते, 22 मे रोजी ही घटना घडली तेव्हा देवी सिंह 23 मे रोजी माझ्याकडे आले होते. त्यानंतर मी सोनमची कुंडली देखील पाहिली होती. राजा आणि सोनम यांना शोधण्यासाठी मी ज्योतिषची मदत घेतली. त्यानंतर मला तीन गोष्टींची माहिती मिळाली. पहिलं दोघंही पूर्वेला गेले आहेत. दुसरं त्यांच्या बेपत्ता होण्यात काही महिला सहभागी आहे. तिसरं राजा आणि सोनमच्या कामाच्या पूर्ततेत विलंब होईल.
advertisement
पंडितजींनी सांगितलेली माहिती जवळजवळ खरी निघाली. राजा आणि सोनम पूर्वेला म्हणजेच शिलाँगला गेले होते. इतके दिवस उलटून गेले पण सोनम सापडली नाही, याचा अर्थ काम पूर्ण होण्यास उशीर होत आहे. त्याच वेळी, सोनम सापडल्यानंतरच एखाद्या महिलेशी असलेले संबंध उघडपणे कळतील. जर या दोन्ही गोष्टी खऱ्या ठरल्या तर त्या महिलेबद्दलची गोष्टही खरी असेल.
advertisement
सोनमचे वडील देवीसिंग रघुवंशी यांनी शेजारी पंडित एनके पांडे यांना यावर उपाय विचारला. तेव्हा त्यांनी मुलीचा फोटो घराबाहेर उलटा लावण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, हा एक प्रकारचा टोटका ज्यामुळे तिचं सुरक्षित परतणं सुनिश्चित होईल. धार्मिक उपायांनी मार्ग निघेल असा देवी सिंह यांचा विश्वास आहे. परिसरातील लोकांनीही सोनमच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली आहे.
advertisement
(सूचना : या लेखात दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही किंवा याचं समर्थन करत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
पंडितने काढला होता शुभमुहूर्त, पण त्याआधीच हनीमूनला गेलं कपल, घडलं भयंकर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement