Indore Couple Missing : शिलाँगहून बेपत्ता झालेली सोनम अखेर सापडली, सुपारी देऊन केली राजाची हत्या; धक्कादायक खुलासा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sonam Raghuvanshi Found in UP : शिलाँगहून बेपत्ता झालेली सोनम आता उत्तर प्रदेशात सापडली आहे, एका ढाब्यावरून फोन करून आपण सुरक्षित असल्याचं सोनमने सांगितलंय.
Indore Couple Missing Case : इंदूरचे राजा आणि सोनम रघुवंशी हे जोडपे मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेले असताना बेपत्ता झाले होते. या प्रकरणाला आता नाट्यमय वळण लागले आहे. राजा रघुवंशी यांचा मृतदेह मेघालयमधील एका दरीत 2 जून 2025 रोजी सापडला होता, ज्याची पोलीस हत्येच्या दिशेने चौकशी करत आहेत. दरम्यान, बेपत्ता असलेली सोनम आता उत्तर प्रदेशात सापडली आहे. काल रात्री उशिरा सोनमने तिचा भाऊ गोविंदला फोन करून याबाबत माहिती दिली. मात्र, त्यानंतर सोनमने सरेंडर केल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी त्याने हत्येची कबुली दिली.
सोमनचं आत्मसमर्पण
शिलाँगहून बेपत्ता झालेली सोनम आता उत्तर प्रदेशात सापडली आहे. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पत्नी सोनमने यूपीतील गाजीपूर येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. रात्री उशिरा झालेल्या छाप्यात इतर तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली.
सोनम उत्तर प्रदेशात कशी पोहोचली?
राजाचा मोठा भाऊ विपिन रघुवंशी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सोनम सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. या घटनेमागील नेमकं कारण आणि सोनम उत्तर प्रदेशात कशी पोहोचली, याबाबतची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
advertisement
सीसीटीव्ही समोर
सोनम बेपत्ता झाल्यानंतर सोनमचा भाऊ सध्या सध्या शिलाँगमध्येच आहे. सोनमला शोधणाऱ्या टीमसोबतच तो आहे. सोनम आणि राजाला शेवटचे हॉटेलमधून बाहेर पडतानाचे सीसीटीव्ही समोर आले आहे. यामध्ये त्यांनी अॅक्टिव्हा भाड्याने घेतली. तिथे त्यांचे शेवटचे लोकेशन देखील ट्रेस करण्यात आले होते. पोलिसांना 21 मे चे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. त्यात हे जोडपे शिलॉंगमधील एका वेगळ्या होमस्टेमध्ये चेक इन करताना दिसत आहे. 4 मिनिटे आणि 53 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये, राजा आणि सोनम दोघेही काळ्या जॅकेटमध्ये, एका पांढऱ्या सुटकेससह होमस्टेमध्ये पोहोचलेले दिसत आहेत.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
इंदौरचे राजा रघुवंशी आणि त्यांती पत्नी सोनम रघुवंसी यांचा विवाह 11 मे रोजी झाला. विवाहानंतर 20 मे रोजी ते हनीमूनला शिलाँगला गेले. कुटुंबाशी त्यांचे शेवटचे बोलणे 23 मे च्या दुपारी झाले होते, त्यानंतर त्यांचा फोन बंद होता. कोणताही संपर्क होत नसल्याने राजा आणि सोनमचा भाऊ इंदौरहून शिलाँगला रवाना झाला. तिथे तपास करताना 2 जून रोजी राजाचा मृतदेह आढळून आला, तर सोनम बेपत्ता असल्याचं समोर आलं होतं.
Location :
Indore,Madhya Pradesh
First Published :
June 09, 2025 8:09 AM IST
मराठी बातम्या/देश/
Indore Couple Missing : शिलाँगहून बेपत्ता झालेली सोनम अखेर सापडली, सुपारी देऊन केली राजाची हत्या; धक्कादायक खुलासा!