TRENDING:

चला ग सयांनो मंगळागौर खेळूया, 'अशी' साजरी करा यंदाची मंगळागौर 

Last Updated:

नवविवाहितेची पहिली मंगळागौर ही तिच्या माहेरी साजरी केली जाते. नवविवाहित स्त्री मंगळागौरीच्या दिवशी दिवसभर उपवास करते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: हिंदू धर्मामध्ये सर्व सणांना विशेष महत्त्व आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. महाराष्ट्रामध्ये श्रावण या मराठी महिन्यातील प्रत्येक मंगळवारी 'मंगळागौर' साजरी केली जाते. अनेक महिला मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. मंगळागौर कशी साजरी केली जाते याविषयी सविस्तर माहिती याठिकाणी दिली आहे.
advertisement

पुराणांतील संदर्भानुसार, मंगळागौरीचे व्रत हे पार्वती देवी म्हणजेच गौरीला समर्पित आहे. याविषयी अधिक माहिती देताना, उमा पाटील म्हणाल्या की, घरात समृद्धी यावी, कुटुंबियांना उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक जीवन सुखी व्हाव, यासाठी मंगळागौरीचे पूजन केले जाते.

साधारणपणे, नवविवाहितेची पहिली मंगळागौर ही तिच्या माहेरी साजरी केली जाते. नवविवाहित स्त्री मंगळागौरीच्या दिवशी दिवसभर उपवास करते. पाटावर पूजा मांडून शंकराची उपासना केली जाते. या पूजे दरम्यान पाटावर वाळूने शंकराची पिंड बनवून त्यावर फुलं, बेलपत्र वाहिले जातात.

advertisement

मंगळागौरीचे व्रत हे विवाहित स्त्रियांसाठी खूप महत्वाचे मानले जाते. मंगळागौर पूजनासाठी स्त्रिया पारंपरिक साजशृंगार करतात आणि आपल्या पतीला व घराला सुख-समृद्धी लाभावी यासाठी व्रत करतात. मंगळागौर व्रताच्या दिवशी रात्री फुगड्या, झिम्मा, पिंगा, बसफुगडी, टिपऱ्या असे पारंपरिक खेळ खेळले जातात. काही स्त्रिया रंगीत दोऱ्यांचे गोफ विणण्याचे देखील खेळ खेळलात जातात. याच्या जोडीला पारंपरिक गाणी गायली जातात. या गाण्यांमध्ये प्रामुख्याने माहेरचे वर्णन असते. सासर आणि सासरच्या मंडळींना गाण्यांच्या माध्यमातून टोमणे लगावले जातात.

advertisement

 2025मधील मंगळागौर कोणत्या तारखांना साजरी केली जाईल

पहिली मंगळागौर: 29 जुलै

दुसरी मंगळागौर: 5 ऑगस्ट

तिसरी मंगळागौर: 12 ऑगस्ट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रसेवा समूहाचा पुढाकार, राबवला मदतीचा मोठा उपक्रम
सर्व पहा

चौथी मंगळागौर: 19 ऑगस्ट

मराठी बातम्या/अध्यात्म/
चला ग सयांनो मंगळागौर खेळूया, 'अशी' साजरी करा यंदाची मंगळागौर 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल