जमुई : हिंदू धर्मातील सर्व देवी देवतांचे आपापले महत्त्व आहे. मात्र, सर्व देवी देवतांमध्ये हनुमानाचे नाव मोठ्या श्रद्धेने घेतले जाते. लोक हनुमानाची पूजा अर्चना करतात. तसेच प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाला प्रार्थना करतात आणि आपल्या मनातील मनोकामना सांगतात. यावेळी अनेक जण हनुमान चालिसा वाचतात. मात्र, हनुमान चालिसाबाबात तुम्हाला अनेक गोष्टी माहिती नसतील.
advertisement
प्रख्यात राम कथा वाचक आचार्य पंडित जगत पांडेय यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट वेळेची आवश्यकता नाही. तसेच, व्यक्तीला कोणतेही विशेष उपाय करावे लागत नाहीत. हनुमान चालिसाचे फळ लोकांना नक्कीच मिळते.
ते पुढे म्हणाले की, हनुमान चालिसेत प्रभू श्रीरामाचे भक्त हनुमानाच्या गुणांचे वर्णन केले गेले आहे. हनुमान चालिसा पठण केल्याने जितका लाभ मिळतो तितकाच लाभ हा फक्त ऐकल्यानेसुद्धा मिळतो. आजच्या काळात लोकांच्या धावत्या जीवनशैलीमुळे त्यांच्याजवळ शांतपणे बसून आणि हवन करून हनुमान चालिसाचा पठण करणे शक्य नसते. त्यामुळे तुम्ही चालता फिरताही जर हनुमान चालिसाचा पाठ केला तरीसुद्धा तितकाच लाभ मिळतो. त्यामुळे दिवसा हनुमान चालिसाचा पाठ करावा, असे ते म्हणाले.
कुणाला मिळाली सरकारी नोकरी, तर कुणाची संकटं झाली दूर, याठिकाणी सर्वांच्या मनोकामना होतात पूर्ण
पुढे ते म्हणाले की, हनुमान जी सर्वांगीण प्रयत्नांचे लाभ देणार आहेत. त्यामुळे हनुमान चालिसाचे पठण केल्याने लोक धर्म, धन, काम आणि मोक्ष प्राप्त करतात. याशिवाय हनुमान चालिसाचे पठण केल्याने लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हनुमान जी अष्टसिद्धी आणि नवनिधी दाता आहेत असे म्हटले आहे. त्यामुळे जो व्यक्ती नियमित रुपाने हनुमान चालिसा पठण करतो, हनुमानजी त्याची मनोकामना नक्की पूर्ण करतात. हनुमान चालिसा पठण केल्याने सर्व नकारात्मक शक्ती दूर जाते. हनुमान चालिसामुळे लोकांचे मनोबल वाढते, असे ते म्हणाले.
Disclaimer : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. ज्योतिषाचार्यांनी आपली मतं व्यक्त केली आहे. न्यूज 18 लोकल मराठी अशा कोणत्याही धार्मिकतेवर आधारीत माहितीची हमी देत नाही.