कोल्हापूर : हिंदू धर्मशास्त्रात धार्मिक विधी परंपरांना खूप महत्त्व आहे. वास्तुशांती, विवाह सोहळा अशा अनेक शुभकार्यांवेळी यज्ञ केला जातो. त्यावेळी हवन कुंडातील अग्नीत विविध घटकांची आहुती देण्याची पद्धत आहे. तर ही आहुती देताना तोंडातून स्वाहा या शब्दाचे उच्चारण केले जाते. मात्र या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? किंवा स्वाहा का म्हटले जाते असा प्रश्न बहुतेक कोणाला पडत नाही. पण धर्मशास्त्रातील प्रत्येक गोष्टीचे महत्त्व जाणून घेऊनच ती गोष्ट केली गेली पाहिजे. म्हणूनच कोल्हापुरातील धर्मशास्त्र अभ्यासक उमाकांत रांगा यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
स्वाहा शब्दाला विशेष महत्त्व
आपण कोणत्याही धार्मिक विधी करताना पंडित किंवा गुरुजी मंत्रपठण करत असतात. ते उच्चारत असलेल्या शब्दांना आपण उच्चारत असतो. मात्र कधी कधी सामान्य वाटणाऱ्या शब्दाला देखील महत्त्वपूर्ण अर्थ असतो. अगदी त्याचप्रमाणे अग्निमध्ये कोणत्याही घटकाचे समर्पण देताना स्वाहा म्हणण्याला देखील विशेष महत्व आहे, असे उमाकांत राणिंगा सांगतात.
हिंदुस्थानवर राज्य करणारे छत्रपती, थोरल्या शाहू महाराजांची समाधी पाहिली का? Video
चार वेदांपैकी सगळ्यात प्रथम वेद म्हणजे ऋग्वेद. आणि ऋग्वेदातील प्रथम अक्षर म्हणजे अग्नी होय. अग्नी मिळे पुरोहितं असा ऋग्वेदाचा प्रारंभ आहे. अग्नी ही देवता अत्यंत प्राचीन काळापासून जगभरातल्या प्रत्येक संस्कृतीमध्ये पूजनीय मानली जात होती. तर देवतेचे आवाहन करण्यासाठी म्हणून काही मंत्र तयार केले गेले. त्या मंत्रांमध्ये स्वाहाकार हा एक अत्यंत महत्वाचा मंत्र मानला गेला आहे, असे राणिंगा यांनी सांगितले आहे.
स्वाहाकार मंत्र नाही
हा स्वाहाकार म्हणजे एक विशिष्ट मंत्र नाही. अग्नीला सर्व देवतांचे मुख मानले जाते. त्यामुळे अग्नीमध्ये समर्पण केलेली वस्तू आणि त्या देवतांचा केलेले आवाहन यातून आपण अग्नीमध्ये समर्पण केलेली वस्तु त्या देवतांपर्यंत पोहोचते. त्यासाठीच देवतेचे आवाहन करताना स्वाहाकार उच्चारला जातो. अशा आपल्या संस्कृतीची परंपरा असल्याचे देखील उमाकांत राणिंगा सांगतात.
चारधाम यात्रेत सर्व रेकॉर्ड मोडले! केदारनाथ मंदिरात 36 हजार भाविकांनी दर्शन घेतलं, PHOTOS
स्वाहा या शब्दाचा असाही अर्थ
याशिवाय विवाहाचा आणखी एक अर्थ असा की, अग्नीची पत्नी किंवा अग्नीची शक्ती म्हणून सुद्धा स्वाहा या शब्दाचा उपयोग आपल्याला महाभारतासारख्या ग्रंथांमध्ये आणि काही प्राचीन धर्मग्रंथांमध्ये पाहायला मिळतो. हा मंत्र इतका महत्त्वाचा आहे की, प्रत्येक देवतांच्या नावाला चतुर्थांत्य प्रत्यय लावल्यानंतर, उदा. इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा, ब्रम्ह्ने स्वाहा असे चतुर्थी प्रत्यय लावून त्या-त्या देवतांना आवाहन केले जाते. हे असे आवाहन करून अग्नीमध्ये समर्पित केलेली वस्तू ही त्या देवतांना तृप्त करते, अशी आपली श्रद्धा आहे. यापाठीमागे असलेले वैज्ञानिक रहस्य म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेल्या स्वाहाकाराच्या ठिकाणी आपल्याला अतिशय शुद्ध वातावरण पाहायला मिळते, असेही राणिंगा यांनी स्पष्ट केले आहे.