भगवान श्रीकृष्ण नेहमी निळ्या रंगात दाखवले जातात. निळा रंग पारदर्शकता दर्शवतो. श्रीकृष्णाचा निळा रंग भौतिक शरीर नव्हे तर अनंत आकाश दर्शवतो, जे आनंद आणि आत्म्याचे प्रतीक आहे.
रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्म कारागृहात झाला तेव्हा सर्व पहारेकरी आणि रक्षक झोपले होते. आपले डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा - ही पाच ज्ञानेंद्रिये, पाच संरक्षक आहेत जी आपल्याला बाहेरच्या जगातच व्यस्त ठेवतात, म्हणून आपण ते आतले अनंत आकाश पाहू शकत नाही. ते तुम्हाला आत्म्याचा अनुभव घेऊ देत नाहीत.
advertisement
म्हणूनच सर्व रक्षक झोपले तेव्हा श्रीकृष्णाचा जन्म झाला. हे यासाठी घडले की जेणेकरून प्राण त्याच्या शरीरात प्रवेश करू शकेल आणि त्या परमानंदाला जगात आणले जाऊ शकेल. वासुदेवांना कृष्णाला एका टोपलीत घेऊन, डोक्यावर ठेवून यमुना नदी पार करून कृष्णाला गोकुळात घेऊन जायचे होते. पाऊस पडत होता आणि ते नदी ओलांडत असताना नदीतील पाणी आणखी वाढू लागले होते. यमुना नदी ही प्रेमाची प्रतीक आहे. अनंताची एक झलक मिळेपर्यंत प्रेमाची लाट वाढतच राहते. मग ती मौनाच्या स्पर्शासाठी खाली येते. म्हणूनच जेव्हा लोक भक्तीसंगीतात तल्लीन होतात तेव्हा तिथेही ते 'वर जातात' आणि नंतर 'खाली येतात' - अगदी यमुना नदीप्रमाणे. गायन करताना माणूस सतत गात राहू शकतो पण गाण्यांच्या मध्ये काही क्षण गहिऱ्या मौनाचे आणि अनंत उंचीच्या आनंदाचे असावेत. ते अत्यंत गरजेचे आहे. भजन गायकांचे बहुतेक गट एखाद्या स्पर्धेत गायल्यासारखे खूप चांगले गातात, परंतु ते दोन भजनांच्या मध्ये थांबत नाहीत आणि भजनांमधील शांत क्षणांचा अनुभव घेत नाहीत.
वासुदेव बाळ श्रीकृष्णाला घेऊन गोकुळात यशोदेकडे गेले. अनंताचा जन्म केवळ योग आणि ध्यानानेच शक्य आहे पण अनंताचे पालनपोषण फक्त योग आणि ध्यानानेच होऊ शकत नाही. त्याचे पालनपोषण करण्यासाठी भक्ती, आदर आणि प्रेमाची गरज असते. श्रीकृष्णाचे संगोपन यशोदा माईने केले. यशोदा माता ही भक्ती, श्रद्धा आणि विश्वासाचे प्रतीक आहे.
गोकुळात यशोदा आपल्या नवजात मुलीसोबत झोपली होती. मध्यरात्री वासुदेव गेले आणि श्रीकृष्णाची त्या मुलीसोबत अदलाबदल केली. ते मुलीला सोबत घेऊन आले आणि श्रीकृष्णाला यशोदेच्या घरी सोडले, जिथे श्रीकृष्ण मोठा झाला. केवळ भक्तीच आपल्यातला आनंद विकसित करू शकते. यशोदा माता हे श्रद्धा, आस्था आणि भक्तीचे प्रतीक आहे. भगवान श्रीकृष्णाच्या आत मानवी शरीराच्या सर्व गुणांचा जन्म होतो. श्रीकृष्णामध्ये तुम्हाला प्रत्येक दृष्टिकोनातून पूर्ण व्यक्तिमत्त्व दिसते. ते बहुआयामी आहेत.
Palmistry: तुमच्या हातावर आहे का ही खून? मग तुम्हीही होणार मालामाल
श्रीकृष्ण हा मानवी क्षमतेचा पूर्ण बहर आहे. तुम्ही त्याला बुद्धाप्रमाणे शांत बसलेले पाहू शकता तसेच तुम्ही त्याला नाचतानाही पाहू शकता. तुम्ही त्याला रणांगणावर बघता आणि त्याची अगदी जवळचा मित्र म्हणूनही अनुभूती घेता; इतकेच काय, तुम्हाला तो खूप खोडकर मुलगा म्हणूनही दिसेल. सारे अस्तित्व श्रीकृष्णात सर्वच बाबतीत पुरेपूर फुललेले आहे.
लेखक
गुरुदेव श्री श्री रविशंकर