पृथ्वीचा 'अक्षीय संथ फेरा'
पृथ्वी स्वतःच्या अक्षावर फिरताना थोडी कललेली आहे आणि ती एका 'भोवऱ्यासारखी' संथ गतीने गोलाकार फिरते. यालाच खगोलशास्त्रात 'प्रिसेशन ऑफ इक्विनॉक्स' म्हणतात. या प्रक्रियेमुळे पृथ्वीचा अक्ष दर 72 वर्षांनी 1 अंशाने सरकतो.
72 वर्षात 1 दिवसाचा फरक
खगोलीय गणनेनुसार, सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो, त्याला आपण मकर संक्रांत म्हणतो. पृथ्वीच्या संथ गतीमुळे दर 72 वर्षांनी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होण्यास सुमारे 20 मिनिटांचा उशीर होतो. हा वेळ साठत जातो आणि अंदाजे 71 ते 72 वर्षांनंतर पूर्ण 24 तास म्हणजेच एक दिवसाचा फरक पडतो.
advertisement
भविष्यात काय होईल?
सध्या आपण संक्रांत 14 किंवा 15 जानेवारीला साजरी करतो. मात्र, खगोल तज्ज्ञांच्या मते, सन 2080 नंतर मकर संक्रांत कायमस्वरूपी 15 जानेवारीला येईल आणि सन 3246 पर्यंत ही तारीख 1 फेब्रुवारी पर्यंत पुढे सरकलेली असेल.
लीप इयरचा प्रभाव
दर चार वर्षांनी येणाऱ्या लीप वर्षामुळे कॅलेंडरमध्ये एक दिवस वाढतो, ज्यामुळे संक्रांत कधी 14 तर कधी 15 जानेवारीला येते. मात्र, 72 वर्षांचा बदल हा पृथ्वीच्या अक्षातील बदलामुळे होणारा कायमस्वरूपी बदल आहे.
उत्तरायण आणि मकर संक्रांत
खऱ्या अर्थाने सूर्य 21-22 डिसेंबरलाच उत्तर दिशेला झुकू लागतो. मात्र, भारतीय पंचांग हे 'निरयन' पद्धतीवर आधारित असल्याने आपण सूर्याच्या राशी प्रवेशाला महत्त्व देतो, जो आता 14 जानेवारीला होतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
