मासिक शिवरात्री कधी आहे?
हिंदू कॅलेंडरनुसार, 2025 ची पहिली मासिक शिवरात्र पौष महिन्यात येईल. पंचांगानुसार, या वर्षी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 27 जानेवारी 2025 रोजी रात्री 08:34 वाजता सुरू होईल आणि ही तिथी 28 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 07:35 वाजता संपेल. मासिक शिवरात्रीचे व्रत 27 जानेवारी 2025 रोजी पाळले जाईल.
advertisement
पूजेचा शुभ मुहूर्त -
मासिक शिवरात्रीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी 05:26 वाजता सुरू होईल. निशिता काळात भगवान शंकराची पूजा सर्वात शुभ मानली जाते. निशिता काळात पूजेची मुहूर्त रात्री 12.07 ते 01 वाजेपर्यंत असेल. या शुभ मुहूर्तावर भगवान शिवाची पूजा केली जाईल.
महिनाभर आधीच अलर्ट! त्रिगृही योगात या राशींवर आभाळ कोसळणार; कुणी नसेल साथीला
मासिक शिवरात्रीचे महत्त्व -
धार्मिक मान्यतेनुसार, मासिक शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा आणि उपवास केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. यासोबतच भगवान शिवाच्या कृपेने कुटुंबात सुख, शांती आणि संपत्ती वाढते. ज्या मुलींच्या लग्नात अडचणी येत आहेत, त्या देखील हे व्रत ठेवू शकतात. या दिवशी खऱ्या भक्तीभावाने पूजा करून उपवास केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होते.
अंगणात-घरात नारळाचं झाड असावं पण या दिशेला; वास्तुशास्त्रानुसार काय सांगतं
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
