पितृदोष शांतीसाठी उपाय देखील केले जातात. पिंडदान, पूर्वजांना जल अर्पण इत्यादी गोष्टी अमावस्येला केल्या जातात. घरात पितृदोषाचा त्रास होत असेल तर अमावस्येला काही उपाय करून आपण या दोषापासून मुक्त होऊ शकतो. पूर्वजांची कृपा राहील, त्यांना मोक्ष मिळण्यास मदत होते.
मौनी अमावस्येला पितृदोष मुक्ती उपाय -
वास्तु विशेषज्ञ, जीवन आणि करिअर सल्लागार डॉ. योगेश शर्मा यांच्या मते, पितृदोष शांतीसाठी दर्श मौनी अमावस्येचे विशेष महत्त्व आहे. आयुष्यातील रखडलेले काम पुढे जाईल. आयुष्यात नशीबाची साथ मिळते. यासाठी मौनी अमावस्येला गरजूंना अन्नदान करावे. हे दान तुमच्या वजनाइतके किंवा तुमच्या वजनाच्या दहावा भाग असावे.
advertisement
हे रत्न ड्रिमस्टोन म्हणून ओळखला जाते! याचे फायदे काय आणि कोणी धारण करावा?
मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही गरीब आणि गरजूंना कपडे दान करू शकता. वापरलेले कपडे, अस्वच्छ कपडे दान करू नयेत.
थंडीचा काळ सुरू असल्यानं गरजूंना ब्लँकेट दान करू शकता. असं करणं तुमच्यासाठी शुभ आणि फळदायी देखील ठरू शकते.
मौनी अमावस्येच्या दिवशी एक विशेष उपाय करावा. हा उपाय म्हणजे मौन व्रत पाळणे. तुम्ही संपूर्ण दिवस मौन धारण करू शकता. जर हे शक्य नसेल तर तुम्ही अर्धा तास, एक तास किंवा दोन तासही मौन पाळू शकता. मौनी अमावस्या हा मौन उपवास करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. या दिवशी आपण काही वेळ मौन धारण करून शांत राहिले पाहिजे. एक किंवा दोन तास मौन पाळून परमेश्वराचे स्मरण करावे. विष्णु सहस्रनामाचे पठण ऐकू शकता किंवा शांतपणे जप करू शकता. यामुळे पूर्वजांना शांती मिळते. आपल्या आयुष्यातही प्रगतीचे मार्ग खुले होतात. प्रलंबित कामे पूर्ण होतील.
कष्ट-परिश्रम थोडं नाही केलेलं! या राशींचे आता भाग्य उजळणार; मंगळाचं बळ पाठिशी
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)