मौनी अमावस्येला हे उपाय करा -
ज्योतिषी पूजा भल्ला यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट EasyVastu9 द्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. मौनी अमावस्येला करायच्या महत्त्वाच्या उपायाबद्दल माहिती दिली आहे. ज्यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, कुटुंबात अडचणी येत आहेत, नातेसंबंध चांगले नाहीत, महत्त्वाची कामे पूर्ण होत नाहीत, तुम्हाला जीवनात अनेक अडचणी आणि समस्या येत आहेत, घरात नकारात्मक ऊर्जा आहे, तर तुम्ही खालील उपाय नक्की करून पहा. आज मौनी अमावस्येला कापूर आणि लवंगाचे उपाय.
advertisement
..तर ब्रेकअप टाळता येऊ शकतो! या राशींना जुळवून घेणं हिताचं ठरेल, लव्ह राशीफळ
या अमावस्येला 21 लवंगा घ्या. तुम्हाला या सर्व लवंगांना कापूरासोबत जाळाव्या लागतील. जळत असताना त्याचा धूर घरात सर्वत्र पसरवा.
अमावस्येदिवशी तुम्ही हनुमान कवच ऐकले पाहिजे. हे दोन उपाय केले तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता निघून जाईल. कुटुंबियांच्या समस्या दूर होऊ लागतील. घरगुती त्रास, नात्यांमधील कटुता, भांडणे इत्यादी हळूहळू कमी होतील. आयुष्यात तुम्हाला मोठे सकारात्मक बदल दिसू लागतील.
तुम्ही हा उपाय प्रत्येक महिन्यातील अमावस्येला (अमावास्येच्या रात्री) करू शकता. तुमचे सर्व दुःख आणि त्रास दूर होतील.
श्रीकृष्णाने सांगितलेले माणसाचे 3 अवगुण! यश-पैसा-किर्ती नेहमीच दूर राहते
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
