काय आहे महत्त्व..?
प्राचीन काळी देव आणि असुर यांच्यात 100 वर्षे घनघोर युद्ध झाले, असुर प्रमुख महिषासुराने देवांचा राजा इंद्र, याचा पराभव करून त्यांचे राज्य जिंकले. त्याने सूर्य, अग्नि, चंद्र, यम, वरूण या सर्वांचे अधिकार काढून घेऊन तो स्वतःच सर्वाचा अधिष्ठाता झाला. सर्व पराभूत देव ब्रह्मदेवाला घेऊन, भगवान शंकर आणि विष्णू यांच्याकडे गेले. त्यांनी सर्व वृत्तांत कथन केला; त्यावेळी सर्व देवांच्या शरीरातून तेज बाहेर पडले. ते सर्व तेज एकत्र होऊन एका स्त्री देवतेच्या रुपात प्रगट झाले. या देवीला पाहून देवांनी तिचा जयजयकार केला. विविध देवांनी आपल्याकडील शस्त्रे देवीला दिली, अशी आख्यायिका सांगितली जाते.
advertisement
नवरात्रीची सातवी माळ : अंबाबाई देवीची नारायणी नमोस्तुते रूपात पूजा, पाहा कशी साकारण्यात आली Video
महिषासुर रेड्याचे रूप घेऊन देवीशी युद्ध करू लागला. देवीने रेड्यावर पाय देऊन, त्याच्या कंठावर शूलाने वार केला; तेव्हा तो महिषासुर स्वतःच्या मुखातून पुरुषार्थ रुपाने बाहेर पडत असताना, देवी मातेने त्याचा तलवारीने शिरच्छेद केला. श्रीदेवी मातेने महिषासुरासह अनेक राक्षसांचा संहार करून त्रैलोक्याचे रक्षण केले, अशी माहिती श्री पूजकांनी दिली आहे.
अशी साकारली पूजा
करवीर निवासिनी अंबाबाई देवीची पूजा ही महिषासुर वधाच्या प्रसंगावर आधारित महिषासुरमर्दिनी रूपातील पूजा बांधण्यात आली आहे. देवी हातातील त्रिशूळाने आणि तलवारीने महिषासुराचा वध करत असल्याचे दर्शविण्यात आले आहे.
दरम्यान, महिषासुर वधाच्या प्रसंगावर आधारित नवरात्र उत्सवात प्रतिवर्षी अष्टमीला बांधली जाणारी ही महिषासुरमर्दिनी रूपातील पूजा अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक निलेश ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी साकारलेली आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)