TRENDING:

नवरात्रीत घटस्थापनेचा मुहूर्त कोणता? जगदंबा प्रसन्न होण्यासाठी ही चूक टाळा

Last Updated:

लवकरच नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे. या काळात घटस्थापनेसाठी योग्य मुहूर्त जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वर्धा, 11 ऑक्टोबर: नवरात्र उत्सव म्हणजे आदिमायेच्या शक्तीचा जागर आणि जगदंबा भवानीला प्रसन्न करण्याचे नऊ दिवस. नवरात्र उत्सवात अनेकांच्या घरी आणि मंडळांमध्ये देखील घटस्थापना केली जाते. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा परंपरा जपल्या जातात. तर यंदा घटस्थापनेचा शुभमुहूर्त काय आहे ? घटस्थापना कशी करावी? नवरात्र उत्सवात कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या चुका टाळायच्या आहेत. याबद्दल आपण वर्धा येथील हेमंत शास्त्री पाचखेडे महाराज यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
advertisement

काय आहे घटस्थापनेचा मुहूर्त

15 ऑक्टोबर 2023 रोजी घटस्थापना आहे. तर घटस्थापनेचा मुहूर्त हा सकाळी 10:47 मिनिटे ते दुपारी 12: 47 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यात सकाळचा लाभ मुहूर्त तर त्यानंतरचा अमृत मुहूर्त आहे. बारा वाजून 47 मिनिटांपर्यंतची वेळ घटस्थापनासाठी उत्तम असल्याचं पाचखेडे महाराज सांगतात.

गुरं चारायला आलेली कन्या गायब अन् रक्ताची धार, विदर्भातील देवीची अनोखी आख्यायिका

advertisement

अशी करा घटस्थापना

एक पत्रावळी घ्या. पत्रावळीमध्ये टोपली घेऊन त्यात माती टाका. मातीमध्ये घट ठेवा आणि त्यात पाच पाने टाकायची. यात वड, औदुंबर, पळस, पिंपळ यासारखी पाने असावीत. पैसा आणि सुपारी टाकायची. घटाचा कंठ धाग्याने बांधून घ्यायचा. त्यावर पाच भांड्याची किंवा उसाची झोपडी ठेवायची. त्यानंतर घटावर नारळ ठेवायचं. नऊ दिवस त्या कलशाला वेगवेगळ्या माळी ठेवायच्या. दिवा बाजूला आणि सुरक्षित जागी ठेवायचा. देवीची आराधना आणि जप करत आपलं मन प्रसन्न ठेवायचं, असं महाराज सांगतात.

advertisement

देवीचा आवडता रंग कोणता? नवरात्रीत नऊ रंगाची कपडे का घालावीत? Video

मन प्रसन्न ठेवून करा हा जप

घटस्थापना करताना 'सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्रंबके गौरी नारायणे नमोस्तुते' हा मंत्र जप करायचा आहे. तसेच आपले चित्त, आपले विचार आणि आपल्या घरचे वातावरण हे प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायचा. नवरात्रोत्सवात आई जगदंबेची उपासना, आराधना आणि जप केल्याने आपले मनोकामना पूर्ण होतात, असे सांगितले जाते.

advertisement

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
नवरात्रीत घटस्थापनेचा मुहूर्त कोणता? जगदंबा प्रसन्न होण्यासाठी ही चूक टाळा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल