देवीचा आवडता रंग कोणता? नवरात्रीत नऊ रंगाची कपडे का घालावीत? Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
नवरात्रीत नऊ दिवस वेगवेगळे रंग कसे ठरवतात? नऊ रंगाचे वस्त्र परिधान करण्याचे काय फायदे आहेत? पाहा महाराज काय सांगतात?
वर्धा, 7 ऑक्टोबर: नवरात्रीच्या दिवसांमध्ये नऊ दिवस ठरवून दिलेल्या रंगांचे वस्त्र अनेक जण परिधान करतात. विशेषतः महिलावर्ग नवरात्रीत ठरलेल्या नऊ रंगांच्या साड्या परिधान करण्यासाठी उत्सुक असतात. मात्र, हे नऊ रंग ठरतात कसे? नऊ रंगाचे वस्त्र परिधान करणं आवश्यक आहे की नाही? निश्चित रंगाचे वस्त्र परिधान केल्याचा खरचं फायदा होतो का? असे प्रश्न अनेकांना असतात. याबाबत वर्ध्यातील हेमंत शास्त्री पाचखेडे यांनी माहिती दिली आहे.
नवरात्रीत नऊ वेगवेगळे रंग ठरवून दिले जातात. मात्र हे नऊ रंग कोण ठरवतं हा प्रश्न सर्वांनाच पडतो. तर याबद्दल महाराज सांगतात की, नवरात्रीतील या नऊ रंगांमध्ये सामाजिक आणि धार्मिक कारण सांगता येईल. सामाजिक कारण असे की, हे रंग व्यापारी वर्ग ठरवतो. सोबतच महिलांनाही वेगवेगळ्या रंगांची आवड असतेच. त्यामुळे यावर्षी नवरात्रीत कोणते नवे रंग आहेत याची उत्सुकता महिलांना जास्त असते. महिला नवरात्रीतील नऊ दिवस त्याच रंगांचे कपडे परधान करणे पसंत करतात.
advertisement
देवीला आवडतो लाल रंग
नवरात्रीत जगदंबा मातेची उपासना केली जाते आणि देवीला लाल रंग जास्त प्रिय आहे. पण नवरात्रीत सांगितलेले नऊ दिवसाचे रंग परिधान करणे हा आवडीचा भाग आहे. संबंधित रंगाचे कपडे परिधान करून देवीच्या दर्शनाला गेल्यास एक वेगळी शक्ती दिसून येते. सर्व महिला एका रंगाच्या वस्त्रात बघून वातावरणात वेगळी ऊर्जा जाणवते. म्हणजे शक्ती जवळ शक्ती जाते. नवरात्रीत देवीची उपासना, आराधना, भक्ती, नामस्मरण, या गोष्टी केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि तुमच्या मागे आई जगदंबेचा आशीर्वाद राहील. त्यामुळे वास्तविकतेत आई जगदंबा देवीची पूजा करून स्वतःचे मन प्रसन्न ठेवणे जास्त महत्त्वाचे ठरेल, असे महाराज सांगतात.
advertisement
तरच त्या रंगाचे वस्त्र परिधान करा
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सांगितलेल्या नऊ रंगांपैकी तो रंग तुमच्याकडे असेल तरच ते वस्त्र परिधान करा. अन्यथा मार्केटमध्ये जाऊन त्या रंगाचे वस्त्र खरेदी करून आणण्याची आणि खर्चात पडण्याची गरज नाही. त्याच पैशांनी आई जगदंबेच्या पूजेचे साहित्य, तिच्या हार, फुलावर खर्च केले तर फायदा होईल, असे महाराज सांगतात.
advertisement
एकता आणि उत्साह
नवरात्रात सर्व महिलांनी सांगितलेल्या रंगांचे कपडे किंवा साडी परिधान केली तर नवरात्री उत्सवाचा एक वेगळा आनंद आणि समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसते. महिलांमध्ये सामाजिक एकता दिसून येते. त्यामुळे या रंगांमागे उत्साह आणि आनंद हे कारण असू शकतं. मात्र जगदंबेला अंबाबाईला लाल रंग जास्त आवडतो. नवरात्रीचे नऊ दिवस शक्यतो काळा रंग टाळून इतर सर्व रंग आपण परिधान करूच शकतो, असं महाराज सांगतात. जर तुमच्याकडे नऊ दिवसांच्या त्या रंगाची साडी किंवा वस्त्र नसेल तर नवीन खरेदी करण्याचीही गरज नाही, असेही हेमंत पाचखेडे महाराज सांगतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
October 07, 2023 4:08 PM IST