नवरात्रीत दारावर तोरण - नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घराच्या मुख्य दरवाजाला सुंदर तोरण बांधणे अत्यंत शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, मुख्य प्रवेशद्वारावर तोरण लावल्याने घरातील नकारात्मकता बाहेरच थांबते आणि घरात मंगलमय वातावरण निर्माण होते. नवरात्रीच्या काळात असे केल्याने माता दुर्गेचे आगमन तुमच्या घरात सुखद होते. जरी बाजारात आजकाल प्लास्टिक किंवा मोत्यांची तोरणं मिळत असली, तरी नैसर्गिक आंब्याच्या पानांचे किंवा अशोकाच्या पानांचे तोरण सर्वात उत्तम मानले जाते. आंब्याची पाने ही शुद्धता आणि मांगल्याचे प्रतीक आहेत, त्यामुळे शक्यतो स्वतः पानांचे तोरण बनवून ते दरवाजावर लावावे.
advertisement
पाण्याचा कलश ठेवा - नवरात्रीच्या काळात घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पाण्याचा कलश ठेवणे वास्तूच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला तांब्याचा किंवा मातीचा कलश पाण्याने भरून ठेवावा. असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात लक्ष्मीचा वास राहतो. कलशाच्या खाली थोडे तांदूळ (अक्षता) ठेवल्यास त्याची शुभता अजूनच वाढते. हा उपाय केल्याने दुर्गा देवी प्रसन्न होतेच शिवाय तुमच्या कुंडलीतील शुक्र आणि चंद्र हे ग्रह सुद्धा मजबूत होतात, ज्यामुळे कौटुंबिक जीवनात शांतता लाभते. मात्र, कलशासाठी वापरायचे भांडे हे नवीन असावे आणि त्यातले पाणी रोज बदलून ताजे पाणी भरावे.
कठीण काळाची पुन्हा सुरुवात! अतिचारी गुरू ग्रह मार्गी, या 4 राशींना भरपूर त्रास
दारावर स्वास्तिक काढा - स्वास्तिक हे चिन्ह हिंदू धर्मात गणपतीचे आणि मांगल्याचे रूप मानले जाते. नवरात्रीत घराच्या मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूंना कुंकवाने किंवा हळदीने स्वास्तिक काढल्याने घराला दृष्ट लागण्यापासून संरक्षण होते. हे चिन्ह सकारात्मकता खेचून घेते आणि कुटुंबाचे मानसिक आरोग्य चांगले ठेवते. मुख्य दरवाजावर स्वास्तिक असल्याने करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतात आणि आर्थिक आवक सुधारण्यास मदत होते. नवरात्रीत देवीच्या पावलांसोबत स्वास्तिक काढल्याने घराची भरभराट होते.
दिवसाची सुरुवात करताना मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवणे आणि तिथे सायंकाळी दिवा लावणे हे देखील नवरात्रीत खूप महत्त्वाचे आहे. वास्तूच्या या साध्या पण प्रभावी उपायांमुळे तुमच्या घरावरील देवीचा आशीर्वाद कायम राहील.
