वाराणसी, 19 सप्टेंबर : बाप्पाला डोळे भरून पाहण्याची इच्छा आज अखेर पूर्ण झाली. घरोघरी, सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पा विराजमान झाला आहे. दरवर्षी भाद्रपद शुक्ल मासाच्या चतुर्थी तिथीला गणेशोत्सव साजरा केला जातो. आता 10 दिवस भाविक आपल्या लाडक्या बाप्पाचा मोठ्या भक्तिभावाने पाहुणचार करतील.
काशीचे ज्योतिषी स्वामी कन्हैया महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश चतुर्थीला आपल्या राशींनुसार बाप्पाला विविध वस्तू अर्पण करणं लाभदायी ठरतं. त्यामुळे बाप्पाचा भरभरून आशीर्वाद मिळतो. पाहूया, कोणत्या राशीच्या व्यक्तींनी बाप्पाला कोणत्या वस्तू अर्पण कराव्या.
advertisement
आयुष्यात एकदातरी घ्या बाप्पाच्या 'या' मंदिरांमध्ये दर्शन
मेष : आपण बाप्पाला लाल फूल अर्पण करावं. त्यामुळे आपल्या सर्व कामांमधील सर्व व्यत्यय दूर होतील आणि आपल्यावर बाप्पाच्या आशीर्वादाचा जणू वर्षाव होईल.
गणपती घरी आले, चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा बाप्पा होईल नाराज
वृषभ : आपण बाप्पाला दह्याचं नैवेद्य दाखवावं. यामुळे आपल्या पाठीशी बाप्पाचा आशीर्वाद कायम राहील.
मिथुन : आपण बाप्पाला दुर्वा आणि केळं अर्पण करावं. यामुळे आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील आणि वादही मिटतील.
कर्क : आपण बाप्पाला दूध आणि दुर्वा अर्पण करावा. यामुळे आपल्या घरात सदैव सुख, शांती आणि समृद्धी नांदेल.
सिंह : आपण पूजेदरम्यान बाप्पाला न विसरता कुंकू अर्पण करा, शिवाय दिवादेखील लावा. यामुळे केवळ बाप्पाचाच नाही, तर लक्ष्मी देवीचा आशीर्वादही आपल्या पाठीशी राहील.
कन्या : आपण बाप्पाला दुर्वा आणि हळदीची माळ अर्पण करावी. यामुळे कुटुंबात प्रचंड आनंदाचं वातावरण निर्माण होईल.
तूळ : आपण पूजेदरम्यान बाप्पाला दूध आणि बेल पानांची माळ अर्पण करावी. यामुळे आपल्या सर्व कामांमधील अडथळे दूर होतील.
वृश्चिक : आपण पूजेदरम्यान बाप्पाला गूळ अर्पण करावा. यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील.
धनू : आपण बाप्पाला पिवळ्या रंगाचं वस्त्र अर्पण करावं आणि पिवळं जानवं घालावं. यामुळे आपल्या वैवाहिक जीवनात अधिक सुख येईल आणि कुटुंबातही आनंदाचं वातावरण निर्माण होईल.
मकर : आपण बाप्पाला लाडू आणि काळ्या तिळांचा नैवेद्य दाखवावा. यामुळे आपल्या आयुष्यात अधिक प्रसन्नता येईल.
कुंभ : आपण बाप्पाला दुर्वा, कुंकू आणि लाल कापड अर्पण करावं. यामुळे आपल्यावर बाप्पाची कृपा कायम राहील आणि आपल्या आयुष्यातील सर्व चिंता दूर होतील.
मीन : आपण पूजेच्यावेळी बाप्पाला हळद अर्पण करावी. यामुळे बाप्पाचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहील.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)