TRENDING:

महाराष्ट्रात इथं खेळली जाते रक्ताची धुळवड, दगडाने फोडतात एकमेकांची डोकी, अशी कशी परंपरा?

Last Updated:

गावातील लोकांनी दोन गट करत एकमेकांवर तुफान दगडफेक केली. यात जखमी झालेल्यांना गावातील जगदंबा देवी मंदिरात भंडारा लावला जातो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इरफान पटेल, प्रतिनिधी 
advertisement

सोलापूर : महाराष्ट्रासह संपूर्ण देशात धुलीवंदन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. एकीकडे संपूर्ण देशात एकमेकांना रंग लावून हा सण साजरा होत असताना, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असणाऱ्या भोयरे गावात मात्र एकमेकांना दगड मारत धुलीवंदन म्हणजेच रक्ताची धुळवड साजरी करण्यात आली. या संदर्भात अधिक माहिती भोयरे गावाचे माजी सरपंच बालाजी साठे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.

advertisement

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भोयरे येथे चक्क रक्ताची धुळवड साजरी केली करण्यात आली. गावातील लोकांनी दोन गट करत एकमेकांवर तुफान दगडफेक केली. यात जखमी झालेल्यांना गावातील जगदंबा देवी मंदिरात भंडारा लावला जातो. जेवढे जास्त लोक जखमी होतील तेवढा पाऊस चांगला पडतो, अशी गावातील लोकांची धारणा आहे.

advertisement

बाप्पा मोरया! धुलिवंदनला दगडूशेठ गणपतीची खास आरास, 2 हजार किलो द्राक्षांचं काय करणार?

भोयरे येथील जगदंबा मंदिर उंचावर आहे. या मंदिरात गावकऱ्यांचा एक गट थांबतो. तर पायथ्याला असणाऱ्या गावातील मुख्य चौकात दुसरा गट उभा राहतो. खाली उभा राहिलेल्या गटातील लोक उंचावर असणाऱ्या मंदिरातील गटावर दगड-गोटे भिरकावतो. तर वरून चौकात थांबलेल्या लोकांवर दगड-गोटे भिरकावले जातात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
धोक्याची घंटा! भारतात 80 टक्क्यांहून अधिक मनोरुग्ण उपचारांपासून वंचित, काय घडतंय
सर्व पहा

खाली थांबलेले लोक अंगावर येणारे दगड चुकवतात. परंतु, या दगडफेकीत काहींना दगड लागतात आणि रक्तही येते. तेव्हा जखमी व्यक्तीला मंदिरात नेत जखमेवर देवीचा भंडारा लावला जातो. त्यामुळे जखम बरी होते, अशी गावकऱ्यांची धारणा आहे. मोहोळ तालुक्यातील भोयरे येथील रक्ताची धुळवड पाहण्यासाठी पंचक्रोशीतून लोक जमले होते.

मराठी बातम्या/अध्यात्म/
महाराष्ट्रात इथं खेळली जाते रक्ताची धुळवड, दगडाने फोडतात एकमेकांची डोकी, अशी कशी परंपरा?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल