यंदा 29 सप्टेंबरपासून पितृपंधरवडा सुरू होणार आहे. 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या आहे. हे 15 दिवस हिंदू धर्मीयांसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. यातली प्रत्येक तिथी विशेष असते, मात्र 3 तिथींना जास्त महत्त्व असतं. त्या तिथींना पितरांचं श्राद्ध करावंच असं म्हणतात. भोपाळमधले ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी त्याबाबत मार्गदर्शन केलं आहे.
advertisement
हिंदू पंचांगानुसार श्राद्ध पक्षातल्या सर्वच तिथी महत्त्वाच्या समजल्या जातात. कारण प्रत्येक तिथीला कोणा ना कोणा पूर्वजाचं निधन झालेलं असतं. त्या तिथींना घराण्यातले वारस त्यांच्या पूर्वजांचं श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करतात. त्या 15 दिवसांपैकी भरणी श्राद्ध, नवमी श्राद्ध आणि सर्वपित्री अमावास्या या तिथींना जास्त महत्त्व आहे.
भरणी श्राद्ध
हिंदू पंचांगानुसार, 2 ऑक्टोबर 2023 ला चतुर्थी श्राद्धासोबत भरणी श्राद्ध करता येईल. त्या दिवशी भरणी नक्षत्र संध्याकाळी 6.24 मिनिटांपर्यंत असेल. धार्मिक मान्यतेनुसार, मृत्यूच्या एक वर्षानंतर भरणी श्राद्ध केलं पाहिजे. लग्नाआधीच ज्यांचा मृत्यू होतो, त्यांचं श्राद्ध पंचमी तिथीला केलं जातं, असं म्हणतात. जर पंचमी तिथीला भरणी नक्षत्र असेल, तर ते खूप विशेष असतं.
पितृपक्षात श्राद्ध करणे शक्य नसेल तर घरच्या घरी करा ‘हे’ उपाय
नवमी श्राद्ध
पंचांगानुसार, 7 ऑक्टोबरला नवमी श्राद्धाची तिथी असेल. त्याला मातृ श्राद्ध किंवा मातृ नवमी असंही म्हटलं जातं. त्या तिथीला घरातल्या निधन झालेल्या स्त्रिया म्हणजे आई, आजी (वडिलांची आई, आईची आई) यांचं श्राद्ध केलं जातं. या दिवशी स्त्री पितरांचं तर्पण किंवा पिंडदान केल्यानं त्या प्रसन्न होतात.
सर्वपित्री अमावास्या
चंद्रतिथीनुसार 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावास्या असणार आहे. ज्या पितरांच्या निधनाच्या तिथीबाबत माहिती नसते, त्यांचं श्राद्ध या दिवशी केलं जातं. थोडक्यात या अमावास्येला सर्व ज्ञात, अज्ञात पितरांचं श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केलं जातं.
श्राद्धाच्या तिथी
29 सप्टेंबर 2023, शुक्रवार पौर्णिमा श्राद्ध
30 सप्टेंबर 2023, शनिवार द्वितीया श्राद्ध
01 ऑक्टोबर 2023, रविवार तृतीया श्राद्ध
02 ऑक्टोबर 2023, सोमवार चतुर्थी श्राद्ध
03 ऑक्टोबर 2023, मंगलवार पंचमी श्राद्ध
04 ऑक्टोबर 2023, बुधवार षष्ठी श्राद्ध
05 ऑक्टोबर 2023, गुरुवार सप्तमी श्राद्ध
06 ऑक्टोबर 2023, शुक्रवार अष्टमी श्राद्ध
07 ऑक्टोबर 2023, शनिवार नवमी श्राद्ध
08 ऑक्टोबर 2023, रविवार दशमी श्राद्ध
09 ऑक्टोबर 2023, सोमवार एकादशी श्राद्ध
11 ऑक्टोबर 2023, बुधवार द्वादशी श्राद्ध
12 ऑक्टोबर 2023, गुरुवार त्रयोदशी श्राद्ध
13 ऑक्टोबर 2023, शुक्रवार चतुर्दशी श्राद्ध
14 ऑक्टोबर 2023, दिन शनिवार, सर्वपित्री अमावास्या.