TRENDING:

नशिबाची साथ अन् धनवर्षाव! घराच्या 'या' दिशेला लावा तुळस, रातोरात चमकेल नशीब

Last Updated:

हिंदू धर्मात तुळशीला केवळ एक रोप मानले जात नाही, तर ती साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, ज्या घरात हिरवीगार आणि बहरलेली तुळस असते, तिथे सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Tulsi Vastu Tips : हिंदू धर्मात तुळशीला केवळ एक रोप मानले जात नाही, तर ती साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, ज्या घरात हिरवीगार आणि बहरलेली तुळस असते, तिथे सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो. मात्र, तुळस केवळ लावणे पुरेसे नाही; ती योग्य दिशेला असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीच्या दिशेला असलेली तुळस घरामध्ये नकारात्मकता आणि आर्थिक समस्या निर्माण करू शकते.
News18
News18
advertisement

'ही' आहे तुळशीसाठी सर्वोत्तम दिशा

वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचे रोप लावण्यासाठी उत्तर किंवा ईशान्य दिशा सर्वात शुभ मानली जाते. ईशान्य दिशेला 'देवांची दिशा' मानले जाते. येथे तुळस लावल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. तर उत्तर दिशा धनाचा राजा कुबेर याची मानली जाते. येथे तुळस लावल्याने आर्थिक मार्ग मोकळे होतात आणि व्यवसायात प्रगती होते. जर तुम्हाला उत्तर किंवा ईशान्येत जागा नसेल, तर पूर्व दिशेलाही तुळस लावता येते. यामुळे समाजात मान-सन्मान वाढतो.

advertisement

चुकूनही 'या' दिशेला लावू नका तुळस

घराची दक्षिण दिशा ही पितरांची आणि यमाची दिशा मानली जाते. वास्तू तज्ज्ञांच्या मते, दक्षिण दिशेला लावलेली तुळस घरामध्ये वास्तुदोष निर्माण करते. यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य बिघडू शकते आणि घरात गरिबी येऊ शकते. दक्षिण दिशेला सूर्यप्रकाश जास्त असल्याने तुळस लवकर सुकते, जे अशुभ मानले जाते. त्यामुळे विसरूनही या दिशेला तुळस ठेवू नका.

advertisement

तुळशीची निगा आणि पूजेचे नियम

स्वच्छता: तुळशीच्या कुंडीभोवती कधीही कचरा, झाडू किंवा चपला ठेवू नका.

पाणी अर्पण करणे: दररोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे, मात्र रविवार आणि एकादशी या दिवशी पाणी घालू नका आणि पाने तोडू नका.

दिवा लावणे: रोज संध्याकाळी तुळशीपाशी शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

advertisement

सुकलेली तुळस: जर तुळस सुकली असेल, तर ती लगेच काढून एखाद्या पवित्र नदीत विसर्जित करावी आणि त्या जागी नवीन रोप लावावे. सुकलेली तुळस घरात ठेवणे अशुभ असते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
झोपताना मोबाईल पाहताय? वेळीच सोडा सवय, नाहीतर मेंदूवर होतील हे परिणाम
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
नशिबाची साथ अन् धनवर्षाव! घराच्या 'या' दिशेला लावा तुळस, रातोरात चमकेल नशीब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल